Rohit Pawar on Ajit Pawar : तर ते प्रतिभा आजींना विचारल पाहिजे..; अजित पवारांच्या त्या प्रश्नावर रोहित पवार स्पष्टचं बोलले...

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार भाजप -शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले.
Rohit Pawar on Ajit Pawar :
Rohit Pawar on Ajit Pawar :Sarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar Spoke on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार भाजप -शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात त्यांनी 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही.. हा माझा गुन्हा झाला का?'असा सवाल उपस्थित केला होता. अजित पवार यांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना सुप्रिया ताईंकडे पक्ष सोपावल्याने ते दुखावले गेले का? असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "खरं तर कधी संधी मिळाली तर प्रतिभा आजींना हा प्रश्न कुणी तरी विचारला पाहिजे. दादा असे म्हणाले तुम्हाला काय वाटतं.. राहिला प्रश्न कुठे जन्मायचा..तर, माझे आई-वडीलही आणि आजोबाही राजकारणात नाहीत.मग मी काय करायचं."

Rohit Pawar on Ajit Pawar :
NCP Crisis : शिवाजी महाराजांच्या एकाही मावळ्याने फितुरी केली नाही… पण आपण…?

रोहित पवार म्हणाले, “अजित पवार यांच्यात खूप मोठी क्षमता आहे. पण,भाजपला कधीही लोकनेते चालत नाहीत. त्यांच्याच पक्षातील आणि बाहेरचेही लोकनेते भाजपला कधीही आवडले नाहीत. त्यामुळे घडत असलेले एक लोकनेता भाजपामुळे संपण्याची भीती वाटते." याचवेळी, येत्या एक वर्षातच एकनाथ शिंदेंचा वर्षात गेम होईल,अशी शंकाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असतो. त्यामुळे ,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपसोबत जाण्याचं अनेकांच्या मनात होते. पण सुप्रिया सुळे यांची आता कार्याध्यक्षपदी निवड झाली.त्यामुळे सुप्रिया सुळे हे बाहेर जाण्याचं कारण होऊ शकत नाही,” असा खुलासा रोहित पवार यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com