Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi : वायनाडसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; देशावासियांनाही केलं 'हे' आवाहन...

Rashmi Mane

Kerala News : केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे झालेला विध्वंस अजूनही कोणी विसरू शकत नाही. वायनाडमधील विध्वंसाची फोटो पाहून ही घटना किती भयानक असू शकेल हे दिसून येतं. यातच काँग्रेस खासदार आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वायनाड दुर्घटनेतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुढे आले आहेत.

त्यांनी आपला एक महिन्याचा पगार वायनाडच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला आहे. राहुल गांधी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहेत, त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “वायनाडमधील आमच्या बंधू आणि बहिणींना मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांना पाठिंब्याची गरज आहे जेणेकरून ते त्यांचे नुकसान भरून काढू शकतील.

मी माझा एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला आहे. पूरग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी मी सर्व भारतीयांना विनंती करतो की त्यांनी शक्य तितकी मदत करावी कारण प्रत्येकाने केलेली छोटीशी मदत महत्त्वाची ठरू शकते.

राहुल गांधी गेल्या लोकसभेत वायनाडमधून खासदारही राहिले आहेत. या लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी वायनाडसह रायबरेलीमधून निवडणूक जिंकली, पण लोकसभेचे सदस्यत्व घेताना त्यांनी वायनाडची जागा सोडली. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

वायनाडच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेस (Congress) केरळच्या निधीत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले. राहुल गांधी म्हणाले की, "वायनाड हा आपल्या देशाचा सुंदर भाग आहे आणि आपण एकत्र येऊन येथील लोकांचे जीवन पुन्हा सुरळीत आणू शकतो."

रविवारी राहुल गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत कार्याबाबत स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली होती. ते म्हणाले, "वायनाड हळूहळू भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसातून सावरत आहे. अजून बरेच काम बाकी आहे, संघटना मदतकार्यात एकत्र काम करत आहेत. 'Stand with Wayanad' - INC या ॲपवर INCKerala फंडमध्ये मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडमधील पर्यटन पुन्हा सुरु करण्यावरही भर दिला. "भूस्खलन संपूर्ण वायनाडमध्ये नव्हे तर एका विशिष्ट भागात घडले. वायनाड हे अजूनही एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि लवकरच आपल्या सौंदर्याने देशभरातील आणि जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होईल," असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT