Anil Deshmukh, CBI
Anil Deshmukh, CBISarkarnama

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा धक्का; CBI कडून गुन्हा दाखल, पुन्हा जेलमध्ये जावे लागणार?

CBI NCP Girish Mahajan : जळगावच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुखांवर आरोप आहे.
Published on

Mumbai : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुखांवर आरोप आहे.

जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या जबाबामध्ये देशमुखांनी धमकावल्याचा उल्लेख आहे. त्याआधारे सीबीआयने देशमुकांवर आरोपी केले आहे. या गुन्ह्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेही आरोपी आहेत.

Anil Deshmukh, CBI
Kim Jong Un : हुकूमशाहाने 30 सरकारी अधिकाऱ्यांना लटकवले फासावर; कारण वाचून बसेल धक्का...

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावमध्येही महाजनांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी देशमुखांकडून मुंढेंवर दबाव टाकला जात होता, असा आरोप आहे. मुंढे यांनीच तसा जबाब सीबीआयकडे दिला आहे. महाजनांवर मोक्काअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेतच महाजनांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी पेनड्राइव्हमध्ये स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. चव्हाण यांना अटक करण्यात आली. आता देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Anil Deshmukh, CBI
Rahul Gandhi : हरियाणात राहुल गांधींनी टाकला मोठा डाव; दोन पहिलवान दाखवणार भाजपला अस्मान?

देशमुख सध्या जामीनावर बाहेर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्याच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांनी देशमुख यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच ते जामीनावर जेलमधून बाहेर आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com