Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama
देश

Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाली; राहुल गांधींनी बदलला ट्विटर बायो, काय लिहिले?

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस (Congress) नेत्यांनी देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली. यासह राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल केला आहे. ट्विटर बायोमध्ये डिस्क्वॉलिफाईड एमपी (disqualified mp) निलंबित खासदार असा स्वत:चा उल्लेख त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या ट्वीटचा हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोदी अडणावरुन केलेल्या टिकेमुळे राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांनी खासदारकी रद्द झाली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वात राजघाटावर आंदोलन करण्यात येत आहे. राहूल गांधी यांना त्यांच्या ट्विटर बायोमध्ये मोठा केला आहे. त्यांच्या बायोमध्ये सदस्य, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि डिस्क्वॉलिफाईड एमपी असे लिहले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर अशाप्रकारे स्वत:चा उल्लेख करत भाजपचा निषेध केला.

Rahul Gandhi Twitter Bio News

दरम्यान, राहुल गांधी यांच्या शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाहीत. मला संसदेत बोलू द्या, असे मी म्हणालो. दोनदा त्यासाठी चिठ्ठी सुद्दा लिहिली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनाही भेटलो. त्यांनी सांगितले की, बोलू देऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

मला मोदींना विचारावे लागले, ते तर बोलू देणार नाही, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत. जनतेच्या मनात एक प्रश्न आला आहे, अदाणी भ्रष्ट माणूस आहे. जनतेला असा प्रश्न पडला की, या भ्रष्ट व्यक्तीला भारताचे पंतप्रधान का वाचवत आहेत? असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT