कैलास शिंदे
Jalgaon News : राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आपल्याला पदापर्यंत पोहचू देत नव्हते.मात्र, जिल्ह्यातील गिरीश महाजन,गुलाबराव पाटील हे दोन मंत्री आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आपल्याला जिल्हा बँकेत अध्यक्षपद मिळाले. मात्र, आपल्या मनात शरद पवार, अजित पवार आहे. त्यामुळे आपण कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही असं मत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे शिंदे गटाचा बाजार समिती निवडणूक निमित्ताने मेळावा होता. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, मी आजही राष्ट्रवादीत आहे,माझ्या मनात शरद पवार(Sharad Pawar),अजित पवार आहेत,मी कधीही राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही,राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या वडिलांनी जिल्ह्यात वाढविली. तिची चौकट माझ्या घरात तयार झाली आहे. जिल्ह्यात जे नेते आहेत ते मला पक्ष म्हणून ज्युनिअर आहेत. राष्ट्रवादी माझ्या मनातून कधीही जाणार नाही.
पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी माझ्या मनातून कधीही जाणार नाही. मात्र मित्र म्हणून सर्वच इतर पक्षत असतात,सद्या सहकारातील जिल्हादुध संघ निवडणुकीपासून गिरीष महाजन,गुलाबराव पाटील मला सोडत नाहीत,मी त्यांना सोडत नाही,आता बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो बघू या मात्र आपण पक्ष म्हणून आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत.
जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला. त्यांना भाजप नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदें गट व भाजपचे संचालक त्यांच्यासोबत राहिले व त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.