Congress-BJP Politics: या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत; प्रियांका गांधींचा थेट हल्लाबोल

Priyanka Gandhi News: राहुल गांधींनी काय गुन्हा केला? अदानी कोण आहे? किमान दोन प्रश्न विचारा
Narendra Modi| Priyanka Gandhi
Narendra Modi| Priyanka Gandhi Sarkarnama

Priyanka Gandhi Criticized PM Narendra Modi : "या देशाची लोकशाही माझ्या कुटुंबाने त्यांच्या रक्ताने जपली आहे. पण ज्यांना वाटतंय की, आमच्यावर केस टाकून, अपमानित करुन आम्हाला घाबरवतील, धमकावतील, तर ते चुकीचे आहे. आम्ही घाबरणार नाही, देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही अधिक भक्कमपणे लढू. पण सत्य हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत,'' अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (The prime minister of this country is a coward; Direct attack of Priyanka Gandhi)

आता माझ्यावरही खटले दाखल करा, मलाही तुरुंगात टाका, पण सत्य हेच आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. आपल्या सत्येच्या मागे लपले आहेत. अहंकारी आहेत आणि या देशाची खुप जुनी परंपरा आहे. हिंदू धर्माची पंरपरा आहे, अहंकारी राजाला जनताच उत्तर देते. आजही काँग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. पण आज संपूर्ण देशाची संपत्ती एकाच व्यक्तीच्या ताब्यात दिली जात आहे. ही देशाची संपत्ती आहे. ही राहुल गांधींची संपत्ती नाही. असंही प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

Narendra Modi| Priyanka Gandhi
Priyanka Gandhi News : वडिलांची आठवण सांगताना प्रियांका गांधी भावूक; जे देशासाठी...

राहुल गांधींनी काय गुन्हा केला? अदानी कोण आहे? किमान दोन प्रश्न विचारा.संपूर्ण संसद एका माणसाला वाचवण्यात व्यस्त आहे? देशात एवढी महागाई का आहे? सिलिंडरच्या किमती हजारांच्या पुढे आहेत... छोट्या व्यापाऱ्यांना मदत केली जात नाही. देशाची संपत्ती लुटली जात आहे. ही राहुल गांधींची मालमत्ता आहे का? ही तुमची मालमत्ता आहे. अदानी रोजगार देत नाही, याकडेही प्रियांका गांधींनी लक्ष वेधलं आहे.

याच वेळी त्यांनी राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. "राहुल गांधींनी परदेशात देशाचा अपमान केला, एका समुदायाचा अपमान केला, असे आरोप केले जात आहेत. पण कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत पायी चालणारा माणूस देशातला प्रत्येक व्यक्ती एक झाला पाहिजे, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी जो लढत आहे. तो कोणाचा अपमान करू शकतो का? असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला.

जगातील सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीत राहुल गांधी शिकलात. त्याला तुम्ही पप्पू म्हणता. तो पप्पू नाही हे कळल्यावर, तो जनतेत जाऊन बोलत असेल तर तुम्हाला त्याची भिती वाटते. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. एका माणसाला थांबवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. राहुल गांधींविरुद्ध ज्याने खटला दाखल केला त्याने एक वर्षासाठी कोर्टात स्थगिती घेतली होती. पण जसे राहुल यांनी संसदेत अदानीबद्दल विधान केले तसे त्याने केस पुन्हा उघडली. महिन्याभरातच राहुलला दोषी ठरवण्यात आले. असंही प्रियांका गांधींनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com