Rahul Gandhi, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींचा वारसदार कोण? राहुल गांधींचा खळबळजनक दावा, एवढा कॉन्फिडन्स आला कुठून?

Narendra Modi successor political controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण असेल, यावर राहुल गांधी यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या पुढील राजकीय नेतृत्वाची चर्चा रंगली आहे.

Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित दाव्यामुळे दिल्लीच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

राहुल गांधींच्या या दाव्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांचे म्हणणे. यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदल होणार का आणि मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी कोणाकडे जाऊ शकते, यावर नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणखी धार मिळाली. राऊत यांनी राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमती दर्शवत मोदी आणखी काही काळच पंतप्रधान राहतील, असा दावा केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबरनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा पंतप्रधान म्हणून तो शेवटचा वाढदिवस असेल. तो त्यांनी आनंदात साजरा करावा.”

मोदींच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याबाबत अमित शाह यांचे नाव चर्चेत आहे त्यावर राऊत म्हणाले “अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाहीत, मोदी गेले तो अमित शाह भी गये,” असे राऊत म्हणाले.

मग विरोधकांना एवढा आत्मविश्वास कुठून आला?

यामागे केवळ राजकीय अंदाज आहे की भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाबाबत काही माहिती विरोधकांपर्यंत पोहोचली आहे, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. मोदींच्या उत्तराधिकारीबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राहुल गांधी किंवा संजय राऊत यांची वक्तव्ये सध्या राजकीय दावे म्हणूनच पाहावी लागतील.

विरोधकांना सध्या मोदी सरकारच्या नेतृत्वावर थेट प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या CWC बैठकीत सरकारविरोधातील विविध मुद्द्यांवर रणनीती आखण्यात आली आहे, तसेच विरोधक सध्या सुरु असलेल्या विद्यार्थी, पेपर लीक, राम मंदिर देणगी आणि इतर विषयांवर केंद्राला घेरणार आहेत.

त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी कोण, अमित शाह यांची भूमिका काय आणि भाजपच्या नेतृत्वात खरोखर बदल होणार का, हे प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र, अजून तरी भाजपकडून अधिकृत निर्णय किंवा स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT