Ladki Bahin Yojana : पात्र लाडक्या बहिणींना सत्ता असेपर्यंत पैसे मिळणार; लाभ घेणारे सरकारी कर्मचारी मात्र रडारवर : CM फडणवीसांचा इशारा

Ladki Bahin Yojana Verification:
Ladki Bahin Yojana audit report
Ladki Bahin Yojana audit reportSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींचा समोर आलेला आकडा शंभर टक्के पडताळलेला आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; मात्र पात्र बहिणींना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या पडताळणीसाठी ई-केवायसी महत्त्वाचा मुद्दा होता. योजना सुरू केल्यानंतर मोठ्या संख्येने लाभार्थी असल्याने दोन-चार महिन्यांत तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत एक कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, त्यांना कोणताही खंड न पडता योजनेचा लाभ मिळत आहे. 

नियमांच्या बाहेर राहून लाभ घेणाऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. काही महिलांच्या लक्षात आले, की त्या प्राप्तिकर भरत असल्याने योजनेसाठी पात्र नाहीत. काही ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतल्याचे, तर काही सरकारी कर्मचारी असल्याचेही आढळले. संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,’’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana audit report
Shalarth e-KYC: शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय; 'या' शिक्षकांचे वेतन रोखणार? तुम्ही 'ही' प्रक्रिया पूर्ण केलीय का?

लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवरही त्यांनी निशाणा साधला. योजनेच्या विरोधात न्यायालयात गेलेले आणि त्यावेळी योजनेवर टीका करणारेच आता सहानुभूती दाखवत असल्याचा आरोपही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com