Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi On Savarkar : राहुल गांधींनी सावरकरांवरील ट्विट केले डिलीट; पण पवारांच्या सल्ल्याने की रणजीत सावरकरांच्या भीतीने?

Rahul Gandhi News : "सावरकरांवर टीका करणार नाही.."

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi On Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नेहमीच एका गटासाठी श्रद्धास्थान तर दुसऱ्या गटासाठी टीकेस पात्र व्यक्तिमत्व ठरत आले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सातत्याने सावरकरांवर टीका केली. सावरकरांना त्यांनी माफिवीर म्हंटलं. यावरून महाराष्ट्रात अनेकदा वाद उफाळून आला. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे राजकीय समीकरण घडून आल्यानंतर राहुल गांधींची सावरकरांवरील टीका ही आघाडीत अंतर्गत धुसफूसीचे कारण ठरत होते.

राहुल गांधी यांची सावरकरांवरील टीका ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रहार करण्याची, ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची संधी होती. मात्र नाशिक येथील मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सावरकरांच्या टिकेवरून जोरदार ठणकावले होते.

यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होईल का? असा प्रश्न निर्माण केला जात होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी हे सावरकरांवर टीका करणार नसल्याचे त्यांनी मान्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावरकर विवादावर मध्यस्थी केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी आणि् शरद पवार दोन्ही नेते उपस्थित होते.

"सावरकरांना माफिवीर म्हणणे योग्य नाही. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात काही संबंध नाही," अशी भूमिका पवारांनी बैठकीत मांडली आणि यावर खर्गे यांनी सहमती दर्शवली. राहुल गांधींनी सुद्धा आपण पवारांच्या मताचा आदर करतो, असं म्हंटले. आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर, आपसात मतभेद असून चालणार नाही, अशी भूमिका घेत, यापुढे आपण सावरकरांवर टीका करणार नसल्याचे, राहुल गांधींनी मान्य केले.

दरम्यान, मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यानंतर आता सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावे सादर करा नाहीतर तुमच्या वर मानहाणीची कारवाई करण्यात येईल, असे सावरकरांचे नातेवाईक रणजीत सावरकर यांनी गांधींना इशारा दिला होता.

यानंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवरील सावरकरांवर टीका केल्याचे सर्व ट्वीट डिलीट करण्यात आले आहेत. पवारांच्या सल्ल्यानंतर राहुल गांधींनी ट्विट डिलीट केले की रणजीत सावरकरांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एक मोठी कारवाई आपल्यावर झाली आता आणखी कारवाई नको, म्हणून राहुल गांधींनी ट्विट डिलीट केल्याचे बोलेले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT