Mahesh Landge On Girish Bapat's Demise : कुस्तीचे प्रशिक्षण घेत होतो तेव्हापासून...; आमदार लांडगेंनी सांगितल्या बापटांच्या आठवणी

Pimpri-Chinchwad : अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना खासदार बापटांनी कानमंत्र दिला होता, गोरखेंनी सांगितली आठवण
Mahesh Landge On Girish Bapat
Mahesh Landge On Girish BapatSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय वाटचालीतील माझा गुरूतुल्य मार्गदर्शक हरपला, या शब्दांत पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शोक व्यक्त केला.

एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावल्याचे सांगत माझ्या राजकीय जीवनात बापटसाहेबांनी कायम ताकद दिली होती, असे आमदार लांडगे म्हणाले. २०१४ ते २०१९ या काळात ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली, याकडे त्यांनी खास लक्ष वेधले.

Mahesh Landge On Girish Bapat
Chhagan Bhujbal : गिरीश बापट यांच्या निधनाने ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड

मी पुण्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेत होतो. तेव्हापासून त्यांचे नेतृत्व मी अनुभवत आहे. अत्यंत स्थितप्रज्ञ असलेल्या या नेत्याने पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भाजपाचा विस्तार करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.

‘राष्ट्र प्रथम…नंतर पक्ष आणि शेवटी मी’ या विचाराने आयुष्यभर राष्ट्रनिष्ठा व पक्षनिष्ठा जोपासणारे म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे ते म्हणाले. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने स्व.खासदार बापटांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच बापट कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही लांडगे म्हणाले.

Mahesh Landge On Girish Bapat
Girish Bapat News : दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली !

सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला

सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा आज आपल्यातून हरपला अशी भावना भाजपचे प्रदेश सचिव आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे युवा नेते अमित गोरखे यांनी बापटांच्या निधनानंतर व्यक्त केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना त्यांनी स्वतः फोन करून बोलावून घेऊन मला काही कानमंत्र दिले होते, अशी आठवण गोरखेंनी सांगितली. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा तेव्हा मला नवी उर्जा मिळाली, असेही ते म्हणाले. आज खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला, अशा बापट यांना गोरखेंनी श्रद्धांजली वाहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com