Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Speech : राहुल गांधींना आवडली मोदींची ‘ती’ योजना; लोकसभेत त्यांच्यासमोर पहिल्यांदाच केलं मान्य, पण...

Parliament Session Live Lok Sabha News PM Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Rajanand More

New Delhi News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी लोकसभेत गदारोळाने सुरूवात झाली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सडेतोड भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी मोदी सरकारची एक योजना चांगली असल्याचे सांगितले. पण त्याचवेळी त्यावरून पलटवारही केला.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ ची संकल्पना चांगली होती. त्याचे आपण पुतळे पाहिले, कार्यक्रम पाहिले, कथित गुंतवणूक पाहिली. पण त्यातून काय मिळाले, हे आता माझ्यासमोर आहे. उत्पादनाच्या बाबतीत ही योजना फेल ठरल्याची टीका राहुल यांनी केली.

मी पंतप्रधानांना याचा दोष देत नाही, त्यांनी प्रय़त्न केले. ही कल्पना चांगली होती. पण ते फेल झाले, असे टोला राहुल गांधींनी यावेळी लगावला. 2014 च्या तुलनेत आताचे उत्पादन घसरले असून 60 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहचले आहे. आपण एक देश म्हणून उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत अपय़शी ठरलो आहोत, असेही राहुल म्हणाले.

राहुल यांनी फोन दाखवत सांगितले की, हा फोन भारतात बनलेला नाही. केवळ भारतात असेंबल केला जातो. यातील सर्व पार्ट चीनमध्ये बनवले आहेत, असे सांगत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. बेरोजगारीच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केले. आपण आजही बेरोजगारीच्य समस्येवर मार्ग काढू शकलेलो नाही. आजपर्यंत यूपीए आणि एनडीए सरकारने या देशातील युवकांना रोजगाराविषयी कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही, असे राहुल म्हणाले.

महाराष्ट्रातील निवडणुकीवर भाष्य

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दाही यावेळी मांडला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे 70 लाख मतदार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यांत वाढले. पाच वर्षांत जेवढी नोंद झाली नाही तेवढी अवघ्या पाच महिन्यात झाली. शिर्डीमधील एका इमारतीमध्ये सात हजार मतदारांची नोंद झाल्याचा दावा राहुल यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT