Parliament Session Live Update : तुम्हाला टेबल तोडण्यासाठी पाठवले आहे का? लोकसभेत गदारोळ, अध्यक्ष संतापले...

Lok Sabha Chairman Om Birla Mahakumha Mela Update Discussion in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवारी सुरूवात झाल्यानंतर विरोधकांकडून महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा मांडण्यात आला.
Parliament News
Parliament NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Latest News : प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. कामकाजाला सुरूवात होताच लोकसभेत विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यास नकार दिल्याने सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली.  

प्रामुख्याने समाजवादी पक्षासह काँग्रेसचे खासदार चेंगराचेंगरीच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. त्यांनी कामकाजादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यसभेतही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत चर्चेची मागणी केली. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने राज्यसभा सदस्यांनी सभात्याग केला.

Parliament News
Delhi Assembly Election : दिल्लीच्या निवडणुकीत भाजप जिंकणार? ‘हे’ पाच मुद्देच ठरणार गेमचेंजर…

लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यानही विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्याने अध्यक्ष बिर्ला यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले. मतदारांनी तुम्हाला संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे. तुम्हाला टेबल तोडण्यासाठी पाठवले आहे की चर्चेसाठी, अशा शब्दांत बिर्ला यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच कामकाज सुरळीतपणे चालू ठेऊ देण्याचे आवाहनही केले.

दरम्यान, प्रश्नोत्तरे पुर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चेला सुरूवात झाली आहे. आजच वक्फ सुधारित विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवालही लोकसभेत सादर केला जाणार आहे. त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Parliament News
Narendra Modi : 'इंदिरा गांधींच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाखांचा टॅक्स होता', नरेंद्र मोदींच्या टार्गेटवर काँग्रेस

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजता बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस संसदेच्या कामकाजामध्ये महत्वाचा ठरणार आहे. वक्फ विधेयकासह महाकुंभ चेंगराचेंगरी आधी मुद्द्यांवर हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com