Rahul Gandhi News : राष्ट्रपतींच्या अभिषानाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा होत आहे. चर्चामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणात नवे काहीच नव्हते. बरोजगाराची मुद्दा नव्हता, असे म्हटले. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या वाढलेल्या संख्येबाबत प्रश्न देखील उपस्थित केला.
राहुल गांधी म्हणाले, 'लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला चांगला यश मिळाले. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिमाचलची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे 70 लाख तेवढे मतदार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यात वाढले. पाच वर्षांत जेवढी नोंद झाली नाही तेवढी अवघ्या पाच महिन्यात झाली. शिर्डीमधील एका इमारतीमध्ये सात हजार मतदारांची नोंद झाली आहे. मी कोणता आरोप करत नाही. काहीना काहीना तरी गडबड आहे.
हिमाचल राज्याच्या लोकसंख्ये येवढे मतदार जादूनेच येतात. आम्ही मतदारांच्या वाढलेल्या संख्येबाबत लोकसभेचे मतदार आणि विधानसभेचे मतदार यांचे नाव, त्यांचा पत्ता देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत जेथे भाजपचा पराभव झाला तेथे मतदारांची संख्या विधानसभेला वाढली. हा डेटा आमच्या जवळ आहे.
निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता, मुख्य न्यायाधीश होते. मात्र, यामधून मुख्य न्यायाधीशांना हटवण्यात आले आहे.न्यायाधीशांना का हटवले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जातीय जनगणना झाली पाहिजे, हा मुद्द मांडत असताना ओबीसी, एससी, एसटी यांचा वाटा वाढवण्याची मागणी केली. ओबीसीवर बोलत असताना सत्ताधारी पक्षातील खासदारांनी राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणले. केंद्रीय मंत्री रिजूजी यांनी राहुल गांधी तुम्ही ओबीसींवर बोलत असता पण तुम्हाला ओबीसी पंतप्रधान दिसत नाही का? असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.