India Alliance protest update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा तसेच एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी विरोधकांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होती. पोलिसांनी हा मोर्चा अडवत नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
संसद भवनापासून सुरू झालेल्या मोर्चा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आकाशवाणी भवनाजवळ अडविला. खासदारांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. राहुल गांधी यांनी थेट बॅरिकेड्सवर चढून तिरंगा फडकावला. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले आहे.
विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले आहेत. काही खासदारांनी पोलिसांच्या वाहनासमोरच लोटांगण घातले आहे. या घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आकाशवाणी भवनात गेले. तिथूनच ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आकाशवाणी भवनाबाहेर मोठा जमाव जमला आहे. खासदारांसह काँग्रेस व विरोधी पक्षांचे अनेक पदाधिकारी याठिकाणी आहेत. त्यामुळे याठिकाणासह निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इंडिया आघाडीच्या या मोर्चामध्ये सर्व विरोधी पक्षांचे १५० हून खासदार तसेच पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. वोट चोर गद्दी छोड, ज्ञानेश इट्स डन ब्रो असे फलक हातात घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.