Rahul Gandhi in Disha Meeting. Sarkarnama
देश

Rahul Gandhi Raebareli news : राहुल गांधी बैठकीतच भाजपचे मंत्री अन् जिल्हाधिकाऱ्यांसमोर संतापले; खड्ड्यांचा फोटोच दाखविला...

Raebareli News, Disha Meeting , Raebareli Road Potholes : रायबरेलीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवर राहुल गांधींचा संताप; बैठकीतच फोटो दाखवत अधिकाऱ्यांना आणि भाजप मंत्र्यांना जाब, निधी असूनही काम का नाही असा सवाल.

Rajanand More

Rahul Gandhi Disha Meeting : काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या (DISHA) बैठकीला हजेरी लावत स्थानिक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला.

राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. त्यांच्या उजव्या बाजूला उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मनोज कुमार पांड्ये तर उजव्या डाव्या बाजूला अमेठीचे खासदार के. एल. शर्मा बसले होते. शर्मा यांच्याशेजारी मंत्री दिनेश प्रताप सिंह होते. तर मंत्री पांड्ये यांच्या शेजारील खुर्चीवर जिल्हाधिकारी सरनीत कौर ब्रोका बसल्या होत्या.

बैठकीत राहुल गांधी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी रस्त्यांवरील खड्डे, साठलेल्या पाण्याचे फोटो अधिकारी आणि मंत्र्‍यांना दाखविले. रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ते चांगलेच भडकले होते. रस्त्यांची अशी स्थिती का आहे, असा थेट प्रश्न त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारला.

सरकार निधी देत असेल तर काम का होत नाही. तुम्ही लोक काय करत आहात, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधींनी केली. जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये होते. बैठकीला येताना ते काही फोटो सोबत घेऊन आले होते. ते फोटो त्यांनी बैठकीत सर्वांना दाखविले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पावसामुळे काही रस्ते खराब झाल्याचे सांगितले. काही रस्त्यांवरील खड्डे बुझविण्यात आले असून काही रस्त्यांचे काम सुरू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावरून मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी टीका केली आहे. दिशा बैठकीतील मुद्द्यांवर ते म्हणाले, राहुल गांधी हे रायबरेलीच्या विकासासाठी नव्हे तर आपला टीआरपी वाढविण्यासाठी इथे येतात, हे सर्वांनी माहिती आहे. बैठकीत राहुल गांधींना दिल्लीतून आलेले तीन लोक कागदावर लिहून देत होते. जेवढे चिठ्ठीत असेल ते तेवढेच बोलत होते. त्यांना योजनांची माहितीच नसेल तर त्याची अंमलबजावणी कसे करणार, अशी टीका सिंह यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT