PM MODI vs Rahul Gandhi .jpg Sarkarnama
देश

Congress Vs BJP: राहुल गांधी परदेशातून परतले, मोदी सरकारला अधिवेशनात अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसनं तोफगोळा जमवला, 3 मुद्दे वादळी ठरणार

Parliament Session: संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले आहेत. यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गुरुवारी(ता.16) काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली.

Deepak Kulkarni

New Delhi News: संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवार (ता.20 जुलै)पासून सुरू होत आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी अधिवेशनात मोदी सरकार पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचना,नारीशक्ती वंदन विधेयक मांडण्याची शक्यता आहे. या धर्तीवर काँग्रेसनेही मोदी सरकारला घेरण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले आहेत. यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गुरुवारी(ता.16) काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतानाच मोदी सरकारसाठी आगामी काळात होत असलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन नक्कीच सोपं नसणार याचेच संकेत दिले आहेत .गांधी हे मोदी सरकारला देशभरात चर्चेत असलेल्या प्रमुख तीन मुद्द्यांवरुन टार्गेट करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या गोटात मोदी सरकारला धारेवर धरण्यासाठी मोठी व्यूहरचना केली जात असल्याचं म्हटलं आहे. यात प्रामुख्यानं नीट परीक्षा पेपरफुटी, अयोध्येतील राम मंदिर चोरी आणि सध्या सर्वसामान्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरत असलेल्या इथेनॉल धोरणांवरुन मोदी सरकारला अडचणीत आणणाऱ्या या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे.

तसेच काँग्रेसनं राजकीय पक्षफोडाफोडीचा मुद्दा, परराष्ट्र धोरण, भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरणं, वाढती महागाई, कोट्यवधी वाहन मालकांवर इथेनॉल मिश्रणाची सक्ती, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ओबीसी, अल्पसंख्याकांच्या विविध मुद्देही विरोधक उचलून धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10, जनपथ येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल, शशी थरूर, पी. चिदंबरम, कुमारी शैलजा आणि मनीष तिवारी,जयराम नरेश यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT