Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ज्याला वाचवण्यासाठी जीव गमावला, त्याच उमेश मानेविरोधात गुन्हा दाखल

Beed Crime News: विलास घुले याच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर आरोपींना मदत केल्याचा आरोप झाल्याने व त्याच्या अटकेच्या मागणीसाठी विलास घुले याचा भाऊ, पत्नी व इतर कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन, रास्तारोको केला होता.
Vilas Ghule Case
Vilas Ghule Case Sarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हाॅटेलचालक विलास घुले यांची आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती. हाॅटेलमध्ये झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याच्यावरच हल्लोखोरांनी वार केले. ज्या उमेश माने याला वाचवण्यासाठी घुले मध्ये पडला होता, त्याच उमेश माने विरोधात आता एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचार आणि धमकावल्या प्रकरणी केज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विलास घुले याच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर आरोपींना मदत केल्याचा आरोप झाल्याने व त्याच्या अटकेच्या मागणीसाठी विलास घुले याचा भाऊ, पत्नी व इतर कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन, रास्तारोको केला होता. दरम्यान, उमेश माने, विलास घुले यांच्यावर एका महिलेने अत्याचार आणि धमकी दिल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले होते.

या महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन उमेश माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात होती. अखेर उमेश माने याच्याविरोधात केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 21 जून रोजी उमेश माने या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची टोळक्याने चाकूने हल्ला करून हत्या केली होती. आता ज्या उमेश मानेला वाचवताना विलास घुले याची हत्या झाली त्या उमेशवरच महिलेचा छळ, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार केल्या प्रकरणी अत्याचार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपी उमेश माने याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला आणि या संपूर्ण प्रकाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला. जेव्हा तिचे कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. याची माहिती मिळताच विलास घुले याचा भाऊ रमेश घुले याने त्यांना रोखल्याचा आरोप आहे.

Vilas Ghule Case
MPSC News: 'एमपीएससी'ची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार? CM फडणवीसांनी लाखो परीक्षार्थींसाठी दिली अत्यंत महत्वाची अपडेट

यापुढे उमेश त्रास देणार नाही, याची गॅरंटी माझी, पण पोलिसांत गेलात तर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकीही रमेश घुलेने दिली होती. त्यानंतर भेदरलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली नाही. तसेच जीवाच्या भीतीने शेताऐवजी गावात येऊन राहत होती. तरी संशयित आरोपी उमेश माने गावात येऊन त्या महिलेला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते, असा आरोप आहे.

विलास घुले आणि उमेश माने हे दोघे बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वारंवार पीडितेच्या घराभोवती चकरा मारायचे. 3 जून रोजी विलास घुले याने पीडितेच्या घरात घुसून, तू उमेशसोबत पूर्वीसारखेच संबंध ठेव, नाहीतर तुझ्या पतीला आणि मुलांना जीवे मारीन, अशी थेट धमकी दिल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले होते..

Vilas Ghule Case
Solapur Air Service : मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर जमिनीवरील स्टार एअरलाईन्सचे अखेर ‘उड्डाण’: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा सुरुवात

त्यानंतर 20 जूनच्या रात्री विलास आणि उमेश पुन्हा तिच्या घरासमोर आले. त्यांनी जोरात गाडीचा हॉर्न वाजवून शिवीगाळ सुरू केली. पीडितेच्या पतीने बाहेर येऊन "आम्हाला सुखाने जगू द्या" अशी विनंती केली असता, आरोपींनी "तू बाहेर ये, तुला खल्लास करतो," अशी धमकी दिली.

या प्रकाराने विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी पीडितेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला होता. अखेर केज पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून उमेश मानेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com