Kerala CM race Congress : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) 140 पैकी 100 हून अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. परंतु इथं मुख्यमंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. रमेश चेन्निथला, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि ‘एआयसीसी’चे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यात चुरस आहे.
या तिघांपैकी के. सी. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्यानं समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. केरळमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षकांचं पथक पाठवले जाणार आहे.
केरळमध्ये काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. या विजयानंतर आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस समितीचे सरचिटणीस व खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नावे शर्यतीत आहेत.
सतीश, वेणुगोपाल आणि चेन्निथला यांचे फलक, भित्तिपत्रके राज्यभर झळकत आहेत. सामाजिक माध्यमांवरील प्रचारामुळे काँग्रेससमोर नेतृत्व निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंतिम निर्णयासाठी किमान आठवडाभर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण तो निर्णय राहुल गांधी (Rahul Gandhi) घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षकांची पथक केरळमध्ये पाठवले जाणार असून, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यासंदर्भात बैठक होणार आहे. तथापि, अंतिम निर्णयात राहुल गांधी यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयापूर्वी पक्षाशी चर्चा करावी, अशी भूमिका भारतीय युनियन मुस्लिम लीगने घेतली आहे. काँग्रेसला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याइतक्या जागा असल्या, तरी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या वायनाडमधील विजयात मुस्लिम लीगचा मोठा वाटा असल्याची आठवण करून दिली आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी वेणुगोपाल यांच्या नावाला मुस्लिम लीगने विरोध दर्शविल्याचेही सांगितले जात आहे.
काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेतील सर्व नेते सक्षम असल्याचे म्हटले. मात्र, सार्वजनिक चर्चांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या पराभव प्रतिक्रिया देताना, काँग्रेसमधील काही नेत्यांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले, "काँग्रेसमधील काही नेते आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेची आहे, ती म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जनमताची झालेली चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. आता क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून तो लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.