Rahul Gandhi sarkarnama
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! पुन्हा खासदारकी धोक्यात? दुहेरी नागरिकत्व प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Rahul Gandhi: या प्रकरणात राहुल गांधी यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही, त्यामुळं आता ते याबाबत का निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

Amit Ujagare

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुहेरी नागरिकत्व प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळं आता याप्रकरणात राहुल गांधी या भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

भाजप नेते विग्नेश शिशिर यांनी अलहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी मागणी केली होती की, राहुल गांधी यांच्याकडं दोन देशांचं नागरिकत्व आहे. भारताबरोबरच ब्रिटनचंही नागरिकत्व त्यांच्याकडं असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. जर असं असेल तर त्याला भारतात निवडणूक लढवता येत नाही, तसंच अशी व्यक्ती खासदार होऊ शकत नाही. त्यामुळं राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या याचिकेतून शिशिर यांनी केली होती.

रायबरेलीच्या विजयावर प्रश्नचिन्ह

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडून आले. यानंतर विग्नेश शिशिर यांनी कोर्टात याचिका दाखल केली की, राहुल गांधी यांच्याकडं ब्रिटिश नागरीकत्व आहे, त्यामुळं त्याचं खासदार होणं हे बेकायदा आहे.

कोर्टानं काय म्हटलं?

या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठानं ही याचिका ऐकून घेतली त्यानंतर राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. कोर्टानं रायबरेली पोलीस ठाण्याला निर्देश दिले की त्यांनी राहुल गांधींविरोधात खटला दाखल करावा. याशिवाय कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारची ही मागणी देखील मान्य केली की, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं सोपवली जावी.

केंद्र सरकारची भूमिका काय?

विग्नेश शिशिर यांनी आपल्या जबाबात म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाशी संबंधित टॉप सिक्रेट फाईल्स कोर्टासमोर सादर करण्यास परवानगी दिली. त्याचं म्हणणं आहे की, याच गोपनिय कागदपत्रांच्या आधारे कोर्टानं हा निर्णय दिला आहे.

आता पुढे काय होणार?

आता सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशी समिती हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे की, राहुल गांधी यांच्याकडं खरोखरच ब्रिटिश नागरिकत्व आहे किंवा नाही. विग्नेश शिशिर यांनी हे देखील म्हटलं आहे की, ते तपासात पोलिसांना मदत करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT