

Rahul Gandhi in Parliament: नारी शक्ती वंदन अधिनियमावर सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात आज विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. सध्याचं विधेयक महिलांना सक्षम करणार विधेयक नसल्याचा दावा केला. तसंच मोदी सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळं सत्तेत टिकून राहण्यासाठी ते दक्षिणेतील राज्यांसोबत भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सरकारचा या मागचा हेतूही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी सभागृहात सांगितलेल्या जादुगारच्या कथेवरुन सभागृहात मोठं रणकंदन झालं.
राहुल गांधी यांनी महिला आरक्षणावर आपलं भाषण सुरु केल्यानंतर सुरुवातीलाच आपला महिला आरक्षणाला विरोध नसल्याचं सांगताना तुम्ही २०२३ मध्ये आणलेलं विधेयक आणा आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं म्हटलं. पण सध्याचं महिला आरक्षण विधेयक हे महिलांना सक्षम करणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. सरकार घाबरल्यानंच सत्तेत टिकून राहण्यासाठी त्यांना मतदारसंघ पुनर्रचना करायची असून त्यासाठी ते दक्षिणेतील राज्यांसोबत भेदभाव करत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.
जादूगारची कथा सांगताना राहुल गांधी म्हणाले, मला माझ्या आजीनं (इंदिरा गांधी) सांगितलं होत की, तु अंधारात पाहायला शिकलं पाहिजे, अंधारातच खरी ताकद आहे. आजीनं सांगितलेलं हे खूपच परिणामकारक राजकीय धडा आहे. जी खरी ताकद असते ती लपून काम करत असते, स्वतःला दाखवत नसते. मी ही कथा याच साठी सांगतोय की, एक पार्टनरशिप आपले जादूगार आणि बिझनेसमन यांच्यामध्ये झाली आहे.
राहुल गांधींनी असं म्हणताच सत्ताधारी खासदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींचं नाव घेत नाही. मी पंतप्रधानांचं नाव घेतलेलं नाही. पण ही पार्टनरशिप मजबूत आहे, पण लपलेली आहे. जादूगारच्या संपूर्ण इतिहासात ही ताकद लपून राहिलेली आहे. जेव्हापासून हा जादूगार इथं आला आहे तेव्हापासून हे सर्व सुरु आहे" अशा शब्दांत मोदींचं नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
दरम्यान, १४० कोटी जनतेनं निवडून दिलेल्या पंतप्रधानांबद्दल असं बोलणं हे चुकीचं असून राहुल गांधींनी तात्काळ याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी यावेळी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यावेळी अनेकदा लोकसभा अध्यक्षांनीही राहुल गांधींना अशी भाषा सभागृहात वापरु नये अशा सूचना केल्या. पण त्यांच्या या सूचनांमुळं राहुल गांधींच्या भाषणात वारंवार अडथळे येत होते. त्यामुळं ते खाली बसत त्यानंतर सत्ताधारी बाकांवरचे सदस्य उठून उभे राहत राहुल गांधींविरोधात आक्रमक होत होते. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा भाषणासाठी उभे राहत होते. पण यामुळं ज्या महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु होती ती काहीशी भरकटल्याचं चित्र निर्माण झालं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.