Rahul Gandhi Truck Travel :
Rahul Gandhi Truck Travel : sarkarnama
देश

Rahul Gandhi Truck Travel : 'भारत जोडो' नंतर राहुल गांधींची 'ट्रक यात्रा'; चक्कं दोन राज्यांचा प्रवास ट्रकमधून..

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : 'भारत जोडो यात्रे'नंतर (Bharat Jodo Yatra) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आता 'ट्रक यात्रे'वर दिसत आहेत. नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी ट्रकमध्ये प्रवास करताना दिसून आले. तसेच, लोकांशी संवाद साधताना ते दिसत आहेत. नुकतंच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. यानंतर राहुल गांधी अधिकच अॅक्टिव्ह होत दिसून येत आहेत. (Rahul Gandhi Truck Travel)

राहुल गांधींनी राजधानी दिल्लीहून (Dehli) ट्रकमधून आपला प्रवास पूर्ण केल्याची बातमी आहे. दिल्लीहून त्यांनी सिमल्यापर्यंत प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. अंबाला इथून ट्रकच्या प्रवासाला सुरूवात करून गांधींनी चंदीगडपर्यंतचं अंतर कापले. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोमवारी रात्रीचा असल्याचे बोलले जाते.

अमेरिका दौरा :

राहुल गांधींनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला होता. आता राहुल गांधी अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून एका बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून रविवारी सांगण्यात आले की, राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कला भेट देणार आहेत. त्या ठिकाणी ते भारत - अमेरिकन लोकांच्या दोन सभांना ते संबोधित करतील, संसद भवनात कायदेतज्ज्ञ आणि थिंक टँकच्या सदस्यांना भेटतील. विद्यार्थ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

विरोधकांची एकजूटीचा प्रयत्न :

सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी एकजुटीच्या उद्देशाने दिल्लीत हजर झाले आहेत. येथे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या बैठकीत राहुल गांधींचाही सहभाग होता. पुढील एक-दोन दिवसांत विरोधी पक्षांकडून मोठ्या सभेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT