Jayant Patil Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग; ईडी'च्या चौकशीनंतर जयंत पाटील आज शरद पवारांना भेटणार...

Jayant Patil ED Enquiry: ईडी'च्या अधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांची नऊ तास चौकशी केली
Jayant Patil meets Sharad Pawar
Jayant Patil meets Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil Meet Sharad Pawar: ईडीने केलेल्या नऊ तासांच्या चौकशी नंतर राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती आहे. ईडीने चौकशी केल्यानंतर पहिल्यांदाच या दोन नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.

Jayant Patil meets Sharad Pawar
Rajasthan News: सचिन पायलटांचा अल्टिमेटम् काँग्रेसने साफ धुडकावला; खर्गे-गहलोत दिल्लीत बैठक!

दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडी'ने जयंत पाटलांना (Jayant Patil) नोटीस पाठवली होती. या नोटीशीनुसार सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजरही झाले. ईडी च्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडेनऊ तास त्यांची चौकशी केली.  चौकशीनंतर रात्री साडे नऊच्या दरम्यान जयंत पाटील बाहेर आले आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले.

यावेळी पाटील म्हणाले, ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. त्यामुळे यानंतर ईडी'कडे (ED) आता कुठलेही प्रश्न शिल्लक राहिले नसतील. तसेच ईडीच्या अधिकार्यांनी मला चांगली वागणूक मिळाली, त्यामुळे त्याविषयी कोणतीही तक्रार करण्याची आवश्यकता नाही. (Jayant Patil ED Enquiry)

Jayant Patil meets Sharad Pawar
Jayant Patil ED Enquiry News : ईडीने जयंत पाटलांना कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले; IL&FS कंपनीची इनसाइड स्टोरी...

पू्र्ण आय़ुष्यात आयएलएफएसशी कुठलाही संबंध आला नाही. ईडीकडून पूर्ण दिवस लेखी जबाब घेतले जातात. म्हणून या चौकशीला वेळ लागतो. तसेच ईडीला तपासादरम्यान मी पूर्ण चौकशीला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. ते मला ज्यावेळी चौकशीसाठी बोलावतील, त्यावेळी मी पुन्हा ईडी कार्यालयात येईल असंही अधिकाऱ्यांना सांगितल्याचं पाटील म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com