Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Tweet : न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींचं ट्वीट; म्हणाले 'माझा धर्म...'

सरकारनांमा ब्यूरो

Rahul Gandhi Convicted : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आली आहे. यानंतर त्यांना जामीन ही मंजूर करण्यात आला, मात्र यामुळे आता राहुल गांधीची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्यांना निवडणुका लढवण्यास बंदी येणार का? अशी ही चर्चा होत आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पहिले ट्वीट केले आहे. राहुल गांधी ट्वीट केली आहे. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा ईश्वर आहे. अहिंसा हे यासाठीचं प्राप्त करण्याचं साधन, असे राहुल गांधी म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

'मोदी' आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता. सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. यानंतर त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला. निकालाच्या वेळी खुद्द राहुल गांधीही कोर्टात हजर होते. 2 वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वही धोक्यात आले आहे.

17 मार्च रोजी सुनावणी संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी आदेश राखून ठेवला होता. 2019 मध्ये राहुल गांधींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्नाटकातील एका निवडणूक सभेत त्यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राहुल म्हणाले होते, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी हेच का?'

यानंतर भाजप आमदार परनेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी निवडणुकीच्या सभेत विधान केल्याचे सांगितले होते. या भेटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT