Sanjay Raut News : संजय राऊतांना शिवसेना संसदीय नेतेपदावरून हटवलं, किर्तीकरांची निवड!

Shivsena News : किर्तीकर नवे शिवसेना संसदीय नेते..
Sanjay Raut News  Eknath Shinde Gajanan Kirtikar
Sanjay Raut News Eknath Shinde Gajanan KirtikarSarkarnama

Eknath Shinde News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. संसदीय नेतेपदी आता मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे.

Sanjay Raut News  Eknath Shinde Gajanan Kirtikar
Ravikant Tupkar News: रविकांत तुपकरांनी शेअर केली 'एका लग्नाची गोष्ट' ; कोर्टाची पायरी चढली अन्..

शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदी आता गजानन किर्तीकर यांची निवड झालेली आहे. संजय राऊत यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच किर्तीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता संसदीय नेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना हे नाव आणि शिवसेना हे चिन्ह मिळाल्यानंतर आता दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे.

Sanjay Raut News  Eknath Shinde Gajanan Kirtikar
Rahul Gandhi News: मोठी बातमी : राहुल गांधींना न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा : खासदारकी धोक्यात येणार?

एकनाथ शिंदे यांनी लोकसभचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. यात असे नमूद आहे की, "२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई शहरात शिवसेना कार्यकारीणीची एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये एकमतानं ठराव झाला की, संजय राऊत इथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील, त्यांच्याऐवजी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड व्हावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर करावे"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com