BJP Vs Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Article News : राहुल गांधींनी राजघराण्यांबाबत व्यक्त केलेल्या 'त्या' मतावरून नवा वाद; भाजप आक्रमक!

BJP Vs Rahul Gandhi News : जाणून घ्या, राहुल गांधींनी लेखात नेमकं काय म्हटलं आहे आणि भाजपच्या कोणत्या नेत्यांनी केली आहे टीका

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi's Article on Indian royal family : काँग्रेस नेते आणि लोकसभेची विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते त्यांच्या इंडियन एक्स्प्रेसमधील लेखामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या लेखात असं काही लिहिले आहे की, भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्यापासून ते केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे.

राहुल गांधींनी(Rahul Gandhi) त्यांच्या लेखात लिहिले आहे की, भारताला ईस्ट इंडिया कंपनीने गप्प केले होते. ते त्यांच्या व्यापारी ताकदीच्या जोरावर नाही, तर आपली पकडीतून गप्प केले होते. कंपनीने आमच्या बहुतांश अधनिस्थ महाराज आणि नवाबांशी भागीदारी करून, त्यांना लाच देवून आणि प्रसंगी धमकावून भारताचा गळा घोटला. त्यांनी आपल्या बँकिंग, नोकरशाही आणि माहिती नेटवर्कला नियंत्रित केले. आम्ही आमचे स्वातंत्र्य कोण्या अन्य देशाच्या हाताने नाही गमावले, हे आम्ही यास जुलमी व्यवस्था चालवणाऱ्या मक्तेदार प्रशासनाकडू ते गमावले.

राजस्थानच्या(Rajasthan) उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी Xवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी आज राहुल गांधींच्या भारताच्या माजी राजघराण्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नांची तीव्र निंदा करते. एकसंध भारतेच स्वप्न भारताच्या माजी राजघराण्यांच्या बलिदानातूनच शक्य झाले आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या अपूर्ण माहितीच्या आधारावर करण्यात आलेले निराधार आरोप पूर्णपणे अस्वीकार्य आहेत.

याशिवाय केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया(Jyotiraditya Scindia) यांनी देखील राहुल गांधींच्या या लेखाची निंदा केली आहे. त्यांनी Xवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, द्वेष विकणाऱ्यांना भारतीय गौरव आणि इतिहासावर व्याख्यान देण्याचा काही अधिकार नाही. राहुल गांधींचे भारताच्या समृद्ध वारशाबद्दलचे अज्ञान आणि त्यांच्या वसाहतवादी मानिसकतेने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. जर तुम्ही राष्ट्राच्या उत्थानाचा दावा करत आहात, तर भारतमातेचा अपमान करणे बंद करा आणि महादजी सिंधिया, युवराज बीर टिकेंद्रजीत, कित्तूर चेन्नमा आणि रानी वेलु नचियार यांच्यासारख्या सच्चा भारतीय नायकांबद्दल जाणून घ्या, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी जोरदार लढा दिला.

याशिवाय म्हैसूर राजचे प्रमुख आणि लोकसभा खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वोडेयर यांनीही राहुल गांधींच्या लेखाचा निषेध केला. त्यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, राहुल गांधींना खऱ्या इतिहासाची माहिती नसल्याची बाब सतत समोर येत आहे. आजच्या त्यांच्या एका लेखाद्वारे त्यांचे तत्कालीन राजघराण्यांनी आजच्या भारतासाठी दिलेले योगदान आणि भारतीय वारशाच्या संरक्षण याबद्दलचे त्यांचे अज्ञान दर्शवते. मी त्यांच्या लेखाचा तीव्र निषेध नोंदवतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT