Railway Recruitment 2026 apply online link and process Sarkarnama
देश

Railway Recruitment 2026 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका! रेल्वेने काढली 11,127 पदांची बंपर भरती; असा करा अर्ज

Indian Railways 11,127 posts recruitment 2026: भारतीय रेल्वेने 11,127 पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

How to apply for Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी तब्बल 11,127 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे.

देशातील विविध रेल्वे झोनमध्ये ही भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू झाली असून 14 जून 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. ऑफलाइन किंवा ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना उमेदवारांनी आपला पसंतीचा RRB झोन निवडणे आवश्यक आहे. अंतिम निवडीनंतर त्याच झोनमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. त्यासोबत ITI, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित शाखेत BE/BTech पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. वयोमर्यादेची गणना 1 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार केली जाणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 500 रुपये ठेवण्यात आले आहे. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे CBT 1 परीक्षा दिल्यानंतर काही रक्कम परत केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांत होणार आहे. यात CBT 1, CBT 2, CBAT परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश असेल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करणाऱ्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे. अर्जामध्ये चूक झाल्यास 17 जून ते 26 जून 2026 दरम्यान दुरुस्तीची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT