Jayant Patil vs Gopichand Padalkar clash : जयंत पाटील-गोपीचंद पडळकरांचे समर्थक आमनेसामने; विट्यात मध्यरात्री तुफान राडा, गाड्या आणि घर फोडलं!

Sangli political violence latest news : सांगलीमध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री जोरदार संघर्ष झाला. या घटनेत गाड्या आणि घराची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jayant Patil vs Gopichand Padalkar clash : जयंत पाटील-गोपीचंद पडळकरांचे समर्थक आमनेसामने; विट्यात मध्यरात्री तुफान राडा, गाड्या आणि घर फोडलं!
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.

जयंत पाटील यांचे समर्थक महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांनी गंभीर आरोप करत, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली असून, संपूर्ण घटना कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Jayant Patil vs Gopichand Padalkar clash : जयंत पाटील-गोपीचंद पडळकरांचे समर्थक आमनेसामने; विट्यात मध्यरात्री तुफान राडा, गाड्या आणि घर फोडलं!
Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना कामाला लागा, महामंडळ नियुक्त्यांचा मार्ग मोकळा! मंत्र्यांच्या बैठकीत सुत्र ठरले! अवघ्या दीड महिन्यात...

महेश कुपाडे यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर ठेवलेल्या एका स्टेटसबाबत काही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हा वाद पुढे हाणामारी व तोडफोडीपर्यंत पोहोचला. संतप्त झालेल्या काही जणांनी ट्रॅव्हल्स कार्यालयावर हल्ला करत काचेचे साहित्य आणि इतर वस्तूंची तोडफोड केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचबरोबर कुपाडे यांच्या घरावर आणि गाडीवरही दारूच्या बाटल्या फेकून नुकसान करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

Jayant Patil vs Gopichand Padalkar clash : जयंत पाटील-गोपीचंद पडळकरांचे समर्थक आमनेसामने; विट्यात मध्यरात्री तुफान राडा, गाड्या आणि घर फोडलं!
PMC News: PMC मध्ये मोठा खांदेपालट! लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना झटका; आयुक्तांचा शिस्तीचा बडगा

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र विटा शहरात पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com