Raja Bhaiya Sarakarnama
देश

Raja Bhaiya News: ... अखेर राजा भैय्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत जाहीर केली भूमिका, म्हणाले...

UP Loksabha Election : जाणून घ्या, जनसत्ता दल लोकतांत्रिक पक्षाची काय असणार भूमिका?

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील कुंडा येथील बाहुबली आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. राजा भैय्या आता लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. मात्र कार्यकर्ते आणि समर्थकांना त्यांनी निवडणूक कालावधीत कोणत्याही पक्षाशी जुडण्याची मूभा दिली आहे.

राजा भैय्या(Raja Bhaiya) यांनी म्हटले की 'कार्यकर्ते आणि समर्थकांना जो योग्य वाटेल, तो निर्णय घेऊ शकतात. कौशांबी मतदारसंघाबाबत म्हटले की दोन्ही प्रमुख उमेदवाराबाबत कोणीही असा नाही, की जो तुमच्या सुख-दु:खात सहभागी होणार नाही. राजा भैय्या स्वत:ची गॅरंटी घेऊ शकतात, कोणा दुसऱ्या उमेदवाराची किंवा नेत्याची नाही. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवारास कोणताही पाठिंबा दिला जाणार नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय राजा भैय्या यांनी हेही सांगितले की, ना भाजपा आघाडीला पाठिंबा असेल, ना समाजवादी पार्टीला पाठिंबा असणार. त्यांनी मंगळवारी पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. याआधी राजा भैय्यांची त्यांच्या कोठीवर जाऊन केंद्रीयमंत्री संजीव बालियान आणि कौशांबीचे खासदार व उमेदवार विनोद सोनकर यांनी भेट घेतली होती.

भाजप(BJP) खासदारांसोबत राजा भैय्याची भेट झाल्याचे फोटोही समोर आले होते. मात्र राज भैय्या यांचा पाठिंबा न मिळाल्याने भाजप आणि उमेदवार विनोद सोनकर यांची अडचणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारसभेस सुद्धा राजा भैय्या यांनी उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT