Varanasi News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी गंगा नदी किनारी दशाश्वमेध घाटावर पूजा केली. वैदिक मंत्रोच्चारात आरतीही केली. त्यानंतर भैरव मंदिरात जाऊ दर्शन घेतले. मंदिरातून ते थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले आणि अर्ज दाखल केला. मोदींच्या अर्जावर चार प्रस्तावकांच्या सह्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) निवडलेल्या चार प्रस्तावकांमध्ये पंडित गणेश्वर शास्त्री, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाहा आणि संजय सोनकर यांचा समावेश आहे. गणेश्वर शास्त्री यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभ मुहूर्त काढला होता. ते ब्राम्हण असून प्रस्तावक म्हणून मोदींनी त्यांची निवड केली आहे. (Lok Sabha Election Update)
ओबीसी (OBC) समाजातील बैजनाथ पटेल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. समर्पित भावनेतून ते अनेक वर्षांपासून संघात कार्यरत आहेत. लालचंद कुशवाहा हे ओबीसी समाजातील असून भाजपचे (BJP) कार्यकर्ते आहेत. तर सोनकर हेही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून ते दलित समाजातील आहेत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रस्तावकांची निवड करताना जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. प्रस्तावकांची निवड करण्यासाठी मागील 15 दिवसांपासून चर्चा सुरू होती. सुरूवातीला 50 जणांची नावे काढण्यात आली होती. त्यातून 18 जणांची नावे पुढे आली. या नावांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सुनील बंसल यांच्यासोबत चर्चा केली होती. चर्चेनंतर चार जणांची नावे अंतिम करण्यात आल्याचे वृत्त ‘न्यूज १८’ ने दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी देशभरातील भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, मित्रपक्षांचे नेते वाराणसीमध्ये उपस्थित होते. त्याआधी मोदींनी सोमवारीच आपल्या मतदारसंघातील प्रचाराला रोड शोने सुरूवात केली. हा रोड शो भव्य दिव्य असाच होता. मोदींनी शक्तीप्रदर्शन करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोबत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.