BJP Latest News Sarkarnama
देश

Rajasthan CM : ‘सरप्राईज’साठी तयार राहा! भाजप आमदाराचे संकेत अन् चर्चांना उधाण

Rajanand More

BJP News : राजस्थानमध्ये १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळवूनही भाजपाला मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करता आलेले नाही. आज आमदारांची बैठक होणार असून त्यामध्ये नावाची घोषणा केली जाणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच इथेही भाजप धक्का देणार की चर्चेतील नावांवर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण एका ज्येष्ठ आमदाराच्या दाव्याने चर्चांना उधाण आले आहे.

भाजपने (BJP) मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सर्वांनाच धक्का दिला. मध्य प्रदेशात मोहन यादव (Mohan Yadav) व छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली आहे. ही दोन्ही नावांवर राजकीय वर्तुळात अजिबात चर्चा नव्हती. मात्र, आमदारांच्या बैठकीत अचानक ही नावे समोर आणत भाजपने राजकीय खेळी खेळली. आता हीच खेळी राजस्थानमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचे ज्येष्ठ आमदार किरोडी लाल मीणा (Kirodi Lal Meena) यांनी तसे संकेत दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्ये (Chhatisgarh) तुमचे विश्लेषण चुकीचे ठरले आहे. आता राजस्थानमध्येही सरप्राईजसाठी तयार राहा.’ मीणा यांच्याकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. पण त्यांनी माध्यमांशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. त्यातच त्यांनी सरप्राईजचे संकेत दिल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे (Vinod Tawade) आणि सरोज पांडे या पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आज जयपूरच्या भाजप मुख्यालयात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळेल. दरम्यान, वसुंधरा राजे, योगी बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, दिया कुमारी यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. याच नावावर शिक्कामोर्तब होणार की, सरप्राईज मिळणार, काही वेळातच समजेल.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT