Arif Mohammed Khan : माझ्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र! राज्यपालांचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

CM Pinarayi Vijayan : एसएफआयच्या कार्य़कर्त्यांचा राज्यपालांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न...
CM Pinarayi Vijayan, Arif Mohammed Khan
CM Pinarayi Vijayan, Arif Mohammed Khan Sarkarnama
Published on
Updated on

Kerala Politics : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप राज्यपालांनीच केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या वाहनाला सीपीआयएमच्या CPI (M) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा करत संतापलेल्या राज्यपालांनी हा आरोप केला आहे.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) कार्य़कर्त्यांनी राज्यपालांच्या (Governor) ताफ्याला सोमवारी काळे झेंडे दाखवले. तसेच त्यांची गाडी थांबवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर राज्यपाल चांगलेच संतापलेले दिसले. गाडीतून खाली उतरत त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर षडयंत्राचा आरोप केला. (Kerala Governor accuses CM Pinarayi Vijayan of conspiring physical harm)

CM Pinarayi Vijayan, Arif Mohammed Khan
Rajasthan CM News: राजस्थानचा मुख्यमंत्री आज ठरणार; मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच भाजप धक्कातंत्र वापरणार?

राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असताना आंदोलनकर्त्यांना त्यांच्या वाहनांसह तिथे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते का? पोलीस कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या वाहनाजवळ जाण्याची परवानगी देतात? इथे आंदोलन करणाऱ्यांची वाहने उभी होती आणि पोलीस त्यांना तिथे थांबवून पळून गेले. मुख्यमंत्री विजयन यांनी लोकांना पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज हे गुंड तिरुवनंतपुरमच्या रस्त्यांवर राज्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते आल्यानंतर मी माझी गाडी थांवून खाली उतरलो. त्यांनी माझ्या गाडीला दोन्ही बाजूने धडक दिली. पोलीस त्यांना ओळखत होते. पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे ते काही करू शकले नाही. मुख्यमंत्रीच लोकांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवत आहेत, असा आरोप राज्यपालांनी केला आहे.

CM Pinarayi Vijayan, Arif Mohammed Khan
Amit Shah : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शाहांची 'कलम 370' वरुन विरोधकांवर प्रश्नांची सरबत्ती; म्हणाले...

राज्यपालांच्या या आरोपानंतर केरळमधील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपनेही या कथित हल्ल्यामागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसनेही यात उडी घेतली असून युडीएफ या संघटनेनेही मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था उध्वस्त झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

(Edited By - Rajanand More)

CM Pinarayi Vijayan, Arif Mohammed Khan
Narendra Modi - Amit Shah : मविआची 'ती' चूक; भाजपने घेतली 'ही' काळजी; मुख्यमंत्री ठरवतानाच दावेदारांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com