Pranab Mukherjee : …या कारणामुळे राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात नव्हते प्रणव मुखर्जी! मुलगी शर्मिष्ठा यांचा मोठा दावा

Sharmistha Mukherjee : ‘प्रणब माय फादर : ए डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकात अनेक दावे
Sharmistha Mukherjee, Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee, Pranab Mukherjee Sarkarnama
Published on
Updated on

Rajiv Gandhi Cabinet : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकातून अनेक राजकीय मुद्यांवर खुलासे केले आहेत. त्यानुसार त्यांनी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात वडिलांना का स्थान मिळाले नाही, यावरही मोठा दावा केला आहे. कुणाच्याही पुढे झुकायचे नाही, अशी वडिलांची भूमिका असायची. त्यामुळेच त्यांना त्यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, असे वडिलांना वाटत होते, असा दावा शर्मिष्ठा यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indiara Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये आपला कार्यकाळ राजकीय जीवनातील सुवर्ण काळ होता, असेही वडील प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) म्हणायचे, असेही शर्मिष्ठा यांनी सांगितले आहे. ‘प्रणब माय फादर : ए डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना शर्मिष्ठा यांनी या आठवणींना उजाळा दिला होता. (Pranab My Father : A Daughter Remembers)

Sharmistha Mukherjee, Pranab Mukherjee
Arif Mohammed Khan : माझ्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र! राज्यपालांचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

काही दाव्यांमुळे झाला वाद

शर्मिष्ठा यांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधी यांच्याविषयी लिहिले आहे. राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१३ रोजी पत्रकार परिषदेत एक अध्यादेश फाडला होता. त्याविरोधात आपले वडीलही होती. पण त्यांचे म्हणणे होते की, यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. राहुल यांनी जो अध्यादेश फाडला होता, त्याचा उद्देश हा दोषी आमदार-खासदारांना तात्काळ अयोग्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बाजूला सारणारा होता. तसेच अध्यादेशामध्ये उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असेपर्यंत सदस्यत्व कायम राहू शकते, अशीही तरतूद होती. अध्यादेश फाडल्याचे मीच वडिलांना सांगितले होते. त्यावर ते खूप चिडले होते, असे शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरएसएसच्या कार्यक्रमात भाग घेण्यास केला होता विरोध

देशाचे राष्ट्रपती असताना आपले वडील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक टीम म्हणून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य़क्रांत भाग घेण्यावरून आपण वडिलांना विरोध केला होता. तीन-चार दिवस आमच्यामध्ये वाद सुरू होता. एक दिवस ते म्हणले की, कोणत्याही गोष्टीला वैध ठरविणारा मी नाही, हा देश आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांसोबत संवाद हवा, असे वडिलांना वाटत होते, अशा आठवणीही शर्मिष्ठा यांनी लिहिल्या आहेत.

Sharmistha Mukherjee, Pranab Mukherjee
Disha Salian Case : अखेर 'एसआयटी' स्थापन..; 'दिशा'च्या चौकशीने 'ठाकरें'च्या अडचणी वाढणार..?

राहुल गांधी यांच्याविषयी पुस्तकात खूप कमी वेळा उल्लेख असल्याचेही शर्मिष्ठा यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘आपले वडील नेहमी म्हणायचे, काँग्रेसने संसदीय लोकशाहीची स्थापना केली आणि ती कायम ठेवण्याचे काम पक्षाचे आहे.’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसकडून केवळ ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे एकटेच उपस्थित होते, असे सांगत शर्मिष्ठा यांनी एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

 (Edited By - Rajanand More)

Sharmistha Mukherjee, Pranab Mukherjee
Rajasthan CM News: राजस्थानचा मुख्यमंत्री आज ठरणार; मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच भाजप धक्कातंत्र वापरणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com