Sachin Pilot, Ashok Gahlot  Sarkarnama
देश

Sachin Pilot will launch own party : काँग्रेसमध्ये भूंकप होणार ; 'पायलट' घेणार नवी भरारी ; 'पीके' च्या मदतीने नवा पक्ष ...

rajasthan sachin pilot will launch his his own party : सचिन पायलट यांची नाराजी दूर झाली नाही. ते आपल्या मुद्दांवर ठाम आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Rajasthan Sachin Pilot will launch his his own party : राजस्थान काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे पक्षश्रेष्ठी सांगत असले तरी अंतर्गत धुसफूस सुरुच आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट येत्या काही दिवसात राजस्थानच्या राजकारणात मोठा भूंकप करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे चित्र आहे.

सचिन पायलट हे येत्या काही दिवसात आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे समजते. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) यांच्या मदतीने सचिन पायलट हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे वृत्त आहे.

'पीके'यांची आयपीएसी (IPAC) या कंपनीशी पायलट यांनी करार केल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यात पायलट नवीन पक्ष स्थापन करतील, असे बोलले जाते. सचिन पायलट हे पुन्हा एकदा गहलोत यांच्यापासून नाराज असल्याचे समजते.

पायलट पक्षातून बाहेर पडल्यास राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला आगामी निवडणुकीच्या पूर्वीच मोठ्या आव्हानाला सामोर जाण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन पायलट यांचा पक्ष स्थापन करण्याचा विचार स्पष्ट असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सर्वकाही ठिक असल्याचा दावा पक्षश्रेष्ठी करीत असले तरी भष्ट्राचाराच्या मुद्यांवरुन सचिन पायलट आक्रमक आहेत. यावर मुख्यमंत्री आवाज उठवत नसल्याने पायलट त्यांच्यावर नाराज आहेत.

दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत पायलट यांनी केलेल्या आक्रमकतेवर काँग्रेसने दुर्लक्ष केले आहे. 'राजस्थान विधानसभा निवडणूक सगळे मिळून लढणार आहेत. आपला विजय निश्चित आहे,' असा विश्वास राज्यातील पक्षश्रेष्ठींना आहे.

अशोक गेहलोत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी २९ मे रोजी माध्यमांनी संवाद साधला होता. गेहलोत आणि पायलट यांच्यासोबत बैठक झाली असून पक्षात नाराजी नसल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. पण त्यानंतर सचिन पायलट यांची नाराजी दूर झाली नाही. ते आपल्या मुद्दांवर ठाम आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT