Rohit Pawar News : 'अहिल्यादेवी' नामकरणावरुन BJP आमदाराला पवारांनी सुनावलं ; 'सोईचं राजकारण ..'

Rohit Pawar News : विकासाचं राजकारण करायला शिका..
Ram Shinde , Rohit Pawar
Ram Shinde , Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Medical College Named Ahilyadevi Holkar : बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली.

राज्य सरकारने त्यासंबंधीचं परिपत्रकही काढलं आहे. या नामकरणावरुन भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे. बारामती च्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे अद्याप स्वागत केलं नाही, असे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी टि्वट करुन विचारले आहे.

Ram Shinde , Rohit Pawar
Odisha Train Accident : हात-पाय नसलेले मृतदेह..काहीचे डोके तर काहीचे धड मिळालं ; रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शीं म्हणतात..

राम शिंदेंच्या या टि्वटला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारांनी टि्वट करीर शिंदेंना सुनावलं आहे. "सोईचं राजकारण करणं बंद करुन विकासाचं राजकारण करायला शिका," असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला आहे.

"मी तीन दिवस चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होतो, हे मान्य केल्याबद्दल राम शिंदे साहेब आपले आभार! आपण तर शासकीय कार्यक्रमाचे आयोजक असतानाही आपलं लक्ष केवळ व्यासपीठावर आणि भाषणावर असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या लोकांचे नियोजन, भोजन, स्मारकाचं सुशोभिकरण आणि इतर सेवा याकडं पूर्ण दुर्लक्ष होतं." असे म्हणत सोहळ्यासाठी आलेल्या हजारो लोकांना माझ्यामुळे सुविधा मिळाल्या असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे," असे रोहित पवारांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Ram Shinde , Rohit Pawar
Eknath Khadse Meets Pankaja Munde : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार ; खडसे म्हणाले ; 'संघर्षयात्री..'

रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात..

आम्ही मात्र राजकारण न करता तुम्ही ठेवलेल्या त्रुटी जाणवणार नाही यासाठी सर्वांनी मिळून लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, याचे आपणही साक्षीदार आहात. राहिला प्रश्न आपण उपस्थित केलेल्या बारामतीच्या लोकप्रतिनिधीचा….तर मी बारामतीचा नाही तर लोकांच्या आशीर्वादाने ४२ हजार मताधिक्याने निवडून आलेला कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी आहे, या वस्तुस्थितीचा चार वर्षांनी तरी स्वीकार करा.

Ram Shinde , Rohit Pawar
Pawar vs Vikhe News : विखे-पवार राजकीय संघर्ष संपला ? ; दोन्ही नेते एकत्र, राम शिंदे अडचणीत ? ; चर्चांना उधाण..

माझी जन्मभूमी बारामती असली तरी कर्जत-जामखेडनेच मला लढायला शिकवलं आणि ती लढाई कशी झाली, हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. दुसरं म्हणजे नामकरणाचं स्वागत केल्याची प्रतिक्रिया देणारा आणि दिल्लीत महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हलवल्याच्या घटनेवर आवाज उठवणाराही मी पहिला असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने माध्यमात बघितलं. आपण मात्र यावर एक ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळं सोईचं राजकारण करणं बंद करुन विकासाचं राजकारण करायला शिका!

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com