Rajasthan New Chief Minister Bhajanlal Sharma Sarkarnama
देश

Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारचा अपघात!

Bhajanlal Sharma Accident News : मथुरेला जात असताना, उत्तर प्रदेशच्या सीमेवर घडला अपघात, जाणून घ्या अधिक माहिती

Mayur Ratnaparkhe

Rajasthan CM Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या कारचा अपघात झाला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते मुथरेला गोवर्धन गिरिराजच्या दर्शनासाठी जात होते.

या दरम्यान उत्तर प्रदेशची सीमा पूंधरी का लौठा जवळ त्यांच्या कारचे चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या नाल्यात गेले. मुख्यमंत्री ज्या बाजूला बसले होते तो भाग एकदम खाली गेला, यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते. मात्र यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा(Bhajanlal Sharma) हे दुसऱ्या गाडीने पुढे मार्गस्थ झाले.

राजस्थान विधानसभा अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. भाजपच्या भजन लाल शर्मा सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. दोन दिवसांत सर्वप्रथम सर्व नवनिर्वाचित आमदरांना शपथ दिली जाईल आणि दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी ज्येष्ठ आमदार कालीचरण सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांची थेट मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंसह(Vasundhara Raje) अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आघाडीवर होती, तर भजनलाल शर्मांचं नाव मात्र कुठेही उच्चारल्या गेलं नव्हतं.

कदाचित त्यांना स्वत:लाही आपण मुख्यमंत्री होणार आहोत, याची कल्पना नसणार. कारण, विधिमंडळ सदस्यांच्या सामूहिक फोटोमध्ये ते अगदी शेवटच्या रांगेत उभा असल्याचे दिसून आले.

मात्र भाजपने सर्व चर्चांना फोल ठरवत, सर्वांचे अंदाज चुकवत आणि दिग्गजांच्या महत्त्वकांक्षांना धक्का देत भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. भजनलाल शर्मा यांच्या रूपाने राजस्थानला तीन दशकानंतर ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला आहे. जयपूरमधील सांगानेर विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे त्यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT