Congress Political News : राज्यसभेतील 10 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते पद टिकणार की नाही याची चर्चा होती. मात्र, विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे कायम राहणार आहे.
राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी पक्षाकडे 25 जागा असणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे सध्या 26 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे हे राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी कायम असतील.
मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष नेते पद मिळण्या इतक्या देखील जागा मिळाल्या नव्हत्या. मात्र, यंदा तब्बल 100 जागांपर्यंत मजल मारून काँग्रेसने लोकसभेचे विरोधी पक्ष नेते पद पटाकवले आहे. शिवाय राज्यसभेतील देखील त्यांचे विरोधी पक्ष नेते पद कायम राहणार आहे.
राज्यसभेतील 10 जागा रिक्त
10 राज्यसभा सदस्य हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील 10 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. राज्यसभा सदस्य असलेले उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale, पियुष गोयल हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहे.
सध्या राज्यसभेत भाजपकडे 90 जागा आहेत. तर एनडीएकडे 110 जागा आहे. मात्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा, आसाम या राज्यांमध्ये भाजपची सरकार आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर पुन्हा निवडणुकीत एनडीए बहुमताच्या 120 जागांच्या जवळ पोहोचेल.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) राज्यसभेवर जाण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस आहे. राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal आणि बाबा सिद्धिकी हे दोघेही इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.