Jaya Bachchan, Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Jaya Bachchan : हा ड्रामा तुम्ही..! जया बच्चन पुन्हा भडकल्या, मग सभापतींनीही घेतलं पत्नीचं नाव...

Rajanand More

New Delhi : संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत पुन्हा एका समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन भडकल्याचे पाहायला मिळाले. सभापती जगदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असे नाव पुकारताच राज्यसभेतील वातावरणच बदलले. मग धनखड यांनीही आपल्या खास शैलीत त्यांना शांत केले.

मागील आठवड्यातच जया अमिताभ बच्चन असे नाव घेतल्याने जया बच्चन चांगल्याच संतापल्या होत्या. सोमवारी पुन्हा असेच घडले. देशातील शंभर स्मार्ट सिटीच्या स्थितीबाबत चर्चा सुरू असताना धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव पुकारले तिथूनच दोघांमधील संवाद वाढत गेला.

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे भाषण संपताच सभापती धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असे पुकारले. त्यानंतर जया बच्चन उठल्या आणि थेट सभापतींना विचारले की, तुम्हाला अमिताभचा अर्थ माहिती आहे का? त्यावर सभापतींनी लगेच बदलून टाका, असे म्हटले. जे नाव निवडणूक प्रमाणपत्रावर येते आणि इथे दिले जाते, त्यामध्ये बदल करता येतो. या प्रक्रियेचा फायदा मी स्वत: घेतला असल्याचे धनखड यांनी सांगितले.

जया बच्चन भडकल्या

सभापती बोलत असतानाच जया बच्चन यांनी त्यांना थांबवले. त्या म्हणाल्या, ‘नाही सर, मला अभिमान आहे. माझ्या पतीच्या नावाचा गर्व आहे. माझे पती आणि त्यांनी केलेल्या कामाचा गर्व आहे. मी खूप खूष आहे.’ धनखड यांनी पुन्हा त्यांना थांबवत बसण्यास सांगितले. त्यावर जया बच्चन भडकल्या आणि म्हणाल्या, काळजी करू नका, हा ड्रामा तुम्ही लोकांनी नवीन सुरू केला आहे. पूर्वी असे नव्हते.

खट्टर यांनी पत्नीचे नाव लावावे

संवादादरम्यान सभापतींनी त्यांच्या फ्रान्स दौऱ्यातील एक किस्सा सांगत अमिताभ बच्चन यांच्यावर संपूर्ण गर्व आहे, असे म्हटले. जया बच्चन यानंतरही शांत बदल्या नाहीत. त्यांनी थेट मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या नावासमोर पत्नीचे नाव लावावे. सर, मी याविरोधात नाही. हे अयोग्य आहे, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

डॉ. सुदेश पती…

जया बच्चन यांच्याकडून खट्टर यांच्या पत्नीचा उल्लेख करताच आपण अनेकदा ओळख करून देताना पत्नीचे नाव सांगितल्याचे धनखड म्हणाले. डॉ. सुदेश पती अशी ओळख करून दिल्याचे धनखड यांनी सांगितले. सुदेश हे आपल्या पत्नीचे नाव असल्याचा खुलासा धनखड यांनी केला. त्यानंतर जया बच्चन यांनी सॉरी सर, म्हणत हा संवाद इथेच थांबवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT