Champat Rai Sarkarnama
देश

Ram Mandir donation case : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात ट्विस्ट; चंपत राय यांना पदावरून हटविण्यासाठी हवे दोन तृतियांश बहुमत

Champat Rai Controversy : देणगी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मंदिरात झालेल्या नियुक्त्यांचा मुद्दाही बाहेर आला आहे. ही प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात आली आहे.

Rajanand More

Ayodhya Ram Mandir news : अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि दुसरे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी यापूर्वी पदाचा राजीनामा दिला आहे. आता राय यांनाही या प्रकरणात अटक करण्याची मागणी समाजवादी पक्षासह अन्य राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

उत्तर प्रदेश सरकारने राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. या पथकाने आठ जणांना अटक केल्यानंतर राय आणि मिश्रा या दोघांचीही चौकशी केली आहे. या दरम्यान, दोघांनीही राजीनामा दिला. मात्र, अद्याप राजीनामा मंजूर झालेला नाही. यामध्ये एक महत्वाचा ट्विस्ट आला आहे. दोघांचाही राजीनामा मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. हे बहुमत न मिळाल्यास त्यांचा राजीनामा नामंजूर केला जाऊ शकतो.

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक ६ जुलैला होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत देणगी चोरीच्या प्रकरणासह राय आणि मिश्रा यांच्या राजीनाम्यावर चर्चा होऊ शकते. यावेळी विश्वस्त मंडळातील सदस्य मतदानाच्या माध्यमातून राजीनाम्यावर निर्णय घेतील. या दोघांचा राजीनामा स्वीकारला जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

ट्रस्टच्या नियमांनुसार विश्वस्तांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. त्यानुसार दोघांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल. ट्रस्टमध्ये एकूण १४ सदस्य असून त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे १२ सदस्य मतदान करतील. दरम्यान, ते या पदावरून हटले तरी विश्वस्त म्हणून कायम राहतील, असाही नियम आहे.

दरम्यान, देणगी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मंदिरात झालेल्या नियुक्त्यांचा मुद्दाही बाहेर आला आहे. ही प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. मंदिरात नोकरीच्या नावाखाली लाच दिल्याचा आरोप होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT