Ayodhya Yatra Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir : रामभक्त मुस्लीम तरुणीची मुंबई ते अयोध्या पायी यात्रा; भगवा हाती घेत करतेय 1425 किलोमीटरचा प्रवास

Shabnam A Muslim Girl Left For Ayodhya From Mumbai : रामभक्त मुस्लीम तरुणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा...

Sachin Fulpagare

Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : मुस्लीम तरुणी रामभक्त... हे ऐकून तुम्ही चकित व्हाल. मात्र हे खरे आहे. मुंबईत राहणारी शबनम गेल्या 21 डिसेंबरला अयोध्येसाठी पायी यात्रा करत आहे. तिच्यासोबत तिचे सहकारी रमन राज शर्मा आणि विनीत पांडे हे आहेत. शबनमला 1425 किलोमीटर पायी यात्रा करायची आहे.

रामभक्तीत तिच्या चेहऱ्यावर थकल्याचा कुठलाही भाव नाही. मुस्लीम असल्याचा तिला अभिमान आहे. मात्र, रामभक्ती आणि श्रीरामाची पूजा करण्यासाठी हिंदू असण्याची अवश्यकता नाही. त्यासाठी एक चांगला माणूस होणे गरजेचे आहे, असे शबनमने सांगितले. शबनम सध्या मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवामध्ये पोहोचली आहे. शबनम आणि तिचे सहकारी रोज 25 ते 30 किमी पायी चालतात. रामभक्तीत रमलेल्या या तरुणांनी अयोध्येत पोहोचण्याची कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही.

शबनम आणि तिच्या सहकाऱ्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यावर शबनमला प्रश्न विचारण्यात आला. आपल्या अयोध्येच्या ( Ram Mandir Ayodhya ) या पायी यात्रेतून दोन संदेश द्यायचे आहेत. पहिला म्हणजे प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. ते कुठल्या जाती-धर्माचे नाहीत. ते फक्त भारताचेच नव्हे तर, संपूर्ण जगाचे आहेत. दुसरा म्हणजे मुलीही कुठे मागे नाहीत. त्याही पायी यात्रा करू शकतात. कुठलेही काम फक्त मुलेच करू शकतात, हा समाजाचा समज आपल्याला तोडायचा आहे, असे शबनम म्हणाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्या यात्रेबाबत आपल्याला मोठी उत्सुकता आहे. यात्रेदरम्यान सोशल मीडियावरून काही टीका झाल्या. पण बहुतेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भगवा झेंडा हातात घेऊन चालते आहे. अनेकदा रस्त्यात भेटणारे मुस्लीम समाजातील नागरिक आम्हाला सलाम करण्याबरोबरच जय श्रीरामही म्हणत आहेत. अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होईल, त्यावेळी आम्हीही तिथे असू, असे लोक म्हणत आहेत. पण अद्याप आम्ही तारीख निश्चित केलेली नाही, असे शबनमने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT