Rambhadracharya : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा उठसूट दावा करणं अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर तुलसी पिठाधीश्वेर स्वामी रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत यांना असे बोलण्याचा अधिकार नाही, असा संताप व्यक्त केला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामभद्राचार्य म्हणाले, मोहन भागवत हे एका संघटनेचे प्रमुख आहेत. ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. त्यांना संतांना निर्देश देण्याचा अधिकार नाही. जिथे जिथे आमची मंदिरे आहेत ती आम्हाला हवीच आहेत.
रामभद्राचार्य म्हणाले, मंदिरे आणि मशिदी आता सोडून द्याव्यात असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. जिथे जिथे आपल्या मंदिरे आहेत त्यात सत्यता आहे तिथेच आपण शोधत आहोत. काही जण राम मंदिराच्या उभारणीनंतर हिंदूचे नेता बनू पाहत आहेत, असेही ते (मोहन भागवत) म्हणाले. कोण नेता बनू पाहात आहे? असा सवाल देखील रामभद्राचार्य यांनी विचारला.
'ते म्हटले धर्माची चुकीची व्याख्या केली जात आहे. धर्माची व्याख्या समजावणारे ते कोण आहेत? धर्माचार्य, जगतगुरु आम्ही आहोत.आमच्या पेक्षा त्यांना अधिक धर्म थोडाच माहिती आहे. त्यांनी असे वक्तव्य करू नये. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत. हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत.', असे देखील रामभद्राचार्य म्हणाले.
'सर्वेक्षणात जिथे जिथे मंदिरे आहेत, तिथे आम्हाला आमचा हक्क घ्यायचा आहे. आम्ही त्यांच्या मशिदी कधीच पाडल्या नाहीत. त्यांनी आमची 30 हजार मंदिरे उध्वस्त केली. त्यामुळे आमची मुख्य मंदिरे जिथे सर्वेक्षणात सापडली आहेत. ती आम्हाला हवी आहेत. आम्हाला त्यांची गरज आहे. आम्हाला दुसरे काही नको आहे. काही लोक हिंदू नेते होत आहेत, असे म्हणण्याचा मोहन भागवत यांना अधिकार नाही. आम्ही नेते बनत नाही तर आमच्या हक्कासाठी लढत आहोत. हिंदू धर्मातील कोणत्याही आचार्याला ते कोणतेही निर्देश देऊ शकत नाहीत, असे देखील रामभद्राचार्य म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.