Ramdev Baba Sarkarnama
देश

Ramdev Baba OBC Controversy : ओबीसीवरून रामदेवबाबांचा नवा 'असत्य'योग; म्हणाले, तो मी नव्हेच!

Ramdev Baba on OBC and Owaisi : 'ध' चा 'मा' करून रामदेवबाबांनी कुशलतेने घेतला यू-टर्न

Avinash Chandane

Ramdev Baba Controversy News :

योगगुरू रामदेवबाबा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी वाद झाल्यानंतर ते अत्यंत सोयीने 'यू टर्न' घेतात. यावेळीही असंच झालं आहे. त्यांच्या ओबीसी वक्तव्यावरून मोठा वाद झाला आहे. अखेर त्यांनी 'मी ते बोललोच नव्हतो,' असे सांगून 'असत्य'योग करून दाखवला आहे.

झालं असं की, योगगुरू रामदेवबाबांचा (Baba Ramdev) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात 'मेरा पूर्व गोत्र ब्रह्म है! मैं अग्निहोत्री ब्राह्मण हूँ मैं! बोले बाबाजी आप तो ओबीसी हो! ओबीसीवाले अपनी ऐसी-तैसी कराए!' असं रामदेवबाबा म्हणाले. यावरून सोशल मीडियावरून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं. रामदेवबाबांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली.

त्यानंतर माध्यमांनी त्यांना गाठलं आणि ओबीसींबाबत आपण असं का बोललात, अशी विचारणा केली. त्यावर रामदेवबाबांनी दिलेलं उत्तर ऐकलं तर 'तो मी नव्हेच'मधील 'लखोबा लोखंडे'लाही मेल्याहून मेल्यासारखे होईल.

योगगुरुंनी काय उत्तर दिलं?

रामदेवबाबा म्हणाले, 'ओवैसी... ओवैसी तो, वो तो उलटा दिमाग का हैंही! ओवैसी उसका, उसके पूर्वजोंका हमेशा देशद्रोही सोच रहा है! उसके बारे में हम गंभीर नही है! ओबीसी के बारे कोई उलटा नही बोला!'

रामदेवबाबांच्या या 'असत्य'योगामुळे माध्यमेही चक्रावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी यापूर्वीही पतंजलीच्या कोरोनावरील औषधांबद्दल एक दावा केला होता. त्यानंतर आपण बोललोच नव्हतो, असा खुलासा केला. शिवाय अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून यू-टर्न घेण्याचा योग त्यांनी अनेकदा साधला आहे.

धार्मिक वाहिनीवर बरळले

रामदेवबाबा एक वाहिनीवर प्रवचन करीत असताना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर आपण ओबीसी (OBC) नाही, तर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) बोललो, असे सांगून रामदेवबाबांनी आपण ओबीसींबाबत कधीच काही बोललो नाही, असा खुलासा केला.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT