Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे ? नितीशकुमारांचा संयोजक पद स्वीकारण्यास नकार

Political News : यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप आणि समन्वयक या विषयावर चर्चा झाली.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

delhi News : : इंडिया आघाडीची शनिवारी ऑनलाईन मिटिंग पार पडली. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप आणि समन्वयक या विषयावर चर्चा झाली. या बैठकीत इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची एकमताने निवड झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीशकुमारांचा संयोजक पद स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे समजते.

इंडिया आघाडीच्या घटक पक्ष या बैठकीस सहभागी झाले होते. या बैठकीला ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची अनुपस्थिती होती. यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावरून इंडिया आघाडीत मतभेद उघड झाले आहेत.

Mallikarjun Kharge
Ambulance Tender Scam : राज्यात आठ हजार कोटींचा टेंडर घोटाळा! सूत्रधार कोण? IAS अधिकारी रडारवर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत जागावाटपाचा अजेंडा, भारत जोडो न्याय यात्रेतील सहभाग आणि युतीशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khrge) यांची आजच्या बैठकीत निवड करण्यात आली असल्याचे समजते. यावेळी बैठकीत अनेक नेत्यांनी खर्गे यांनी संयोजक व्हावे अशी भूमिका मांडली. त्यावर चर्चा यावेळी करण्यात आली असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नितीश कुमार यांनी स्वतः संयोजक होण्यास आपण इच्छूक नसल्याचं जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात आघाडी मजबूत व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे नितीश कुमार (nitish kumar)यांनी बैठकीप्रसंगी स्पष्ट केले.

(Edited By sachin waghmare)

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : एक मोदी सर्वांना भारी म्हणतात, मग हे मणिपूरला का जात नाहीत? खर्गेंचा सवाल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com