Ramesh Bidhuri | Chief Minister Atishi Sarkarnama
देश

Ramesh Bidhuri : रमेश बिधूडींची जीभ पुन्हा घसरली; प्रियंका गांधींनंतर आता मुख्यमंत्री आतिशींबाबत केलं वादग्रस्त विधान!

Ramesh Bidhuri Controversial statement : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापणार; जाणून घ्या, कोण आहेत रमेश बिधूडी आणि त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Delhi News: दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी भाजपचे माजी खासदार आणि उमेदवार रमेश बिधूडी यांनी एकाच दिवसांत दोन वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय वातावरण तापलं आहे. आधीतर त्यांनी काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केलं आणि मग त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबाबत असं काही म्हटलं की ज्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

दिल्लीत एका रॅलीत रमेश बिधूडी यांनी म्हटले की, आतिशी यांनी तर आपला पिताच बदलला. आधी तर त्या मार्लाना होत्या आता सिंह झाल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी तर तरुणांची हत्या करण्यासाठी दोषी असलेल्या अफजल गुरूला फाशी माफ करावी यासाठी याचिका दाखल केली होती.

रमेश बिधूडी यांनी त्यांच्या कालकाजी मतदारसंघात भाजपकडून (BJP) आयोजित आलेल्या कार्यक्रमात आपण कालकाजीमधील सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत बनवणार असल्याचे म्हटले होते.

रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधींबाबत (Priyanka Gandhi) केलेल्या वक्तव्यानंतर वाद उद्भवला. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याविषयी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना बिधूडी म्हणाले, लालू प्रसाद यादव यांनी हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे बिहारचे रस्ते बनवण्याबाबत विधान केले होते. त्या विधानाने हेमाजी दुखावल्या होत्या. मात्र, तेव्हा जर ते विधान चुकीचे असते तर काँग्रेसने त्यावरही बोलायला हवे होते.

यावेळी दिल्लीत तिरंगी लढत रंजक होणार आहे. केजरीवाल यांच्यासमोर त्यांचे सरकार पुन्हा स्थापन करण्याचे आव्हान असताना, भाजपला 1998 पासून सत्तेपासून दूर राहण्याची खंत संपवायची आहे. दरम्यान, दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या सरकारनंतर काँग्रेसलाही स्वबळावर सत्ता उपभोगता आली नाही. म्हणजे कुठेतरी सत्ता वाचवण्याचे आव्हान आहे तर कुठे सत्तेत येण्याची उद्विग्नता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT