Ramesh Bidhuri Video : प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवू, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Ramesh Bidhuri Controversial Statement on Priyanka Gandhi : रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी त्यांना हेच का RSS चे संस्कार असा प्रश्न विचारला आहे.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Ramesh Bidhuri News : भाजपचे नेते आणि दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कालकाजी परिसरात भाजपकडून आयोजित आलेल्या कार्यक्रमात आपण कालकाजीचे रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत बनवणार असल्याचे बिधुरी यांनी म्हटले आहे.

रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर वाद झाला. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याविषयी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना बिधुरी म्हणाले, लालू प्रसाद यादव यांनी हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे बिहारचे रस्ते बनवण्याबाबत विधान केले होते. त्या विधानाने हेमाजी दुखावल्या होत्या. मात्र, तेव्हा जर ते विधान चुकीची असते तर काँग्रेसने त्यावरही बोलायला हवे होते.

Priyanka Gandhi
Indian American Member of Congress : अमेरिकन संसदेत वाढला भारतीयांचा दबदबा; सहा जणांनी घेतली खासदारकीची शपथ!

'काँग्रेसचे पवन खेडा अँड कंपनी राजकारणात पायाचे तळवे चाटून इथपर्यंत पोहोचले आहेत. ते जनतेची सेवा करून पोहोचलेले नाहीत. दलालीच्या माध्यमातून ते इथपर्यंत पोहोचले असतील. त्यांनी आधी लालू यादव यांचे विधान चुकीचे आहे, असे म्हणावे आणि त्यानंतर माझ्यावर टीका करावी', असे देखील रमेश बिधुरी म्हणाले.

प्रियांका गांधींपेक्षा हेमा मालिनी पुढे

बिधुरी म्हणाले, महिलांच्या सन्मानाचा प्रश्न होता तेव्हा हेमा मालिनी यांच्याविषयी बोलण्यानंतर काँग्रेस गप्प का राहिली? हेमा मालिनी यांचे देशाच्या राजकारणात, चित्रपट क्षेत्रात योगदान आहे. काँग्रेसने विचारावे की हेमा मालिनी आणि प्रियंका यांची पातळी समान आहे का? हेमा मालिनीसमोर प्रियंकाजी कुठेच नाहीत उभ्या नाहीत.

Priyanka Gandhi
Santosh Deshmukh march : ना युती, ना आघाडी पुण्यातील सर्वच आमदार, खासदारांनी संतोष देशमुख यांच्यासाठी काढलेल्या मोर्चाकडे फिरवली पाठ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com