Ramesh Chennithala Sarkarnama
देश

Congress Politics : काँग्रेसमधील मोठ्या नेत्याचे बंड झाले 'थंड', 'त्या' फोननंतर तलवार म्यान!

V. D. Satheesan Rahul Gandhi keral Politics : आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवणाऱ्या नेत्याने अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे केरळमध्ये मोठे बंड थांबण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले आहे.

Roshan More

Congress News : केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले ज्येष्ठ रमेश चन्नीथला हे थेट काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत होता. त्यांनी आपल्या आमदराकीचा राजीनामा देण्याची तयारी देखील दाखवली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंड होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, चेन्नीथला यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली आहे.

ते म्हणाले, "मी नेहमीच काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस जे सांगते, तेच मी करतो. मी नेहमीच एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता आहे."

चेन्नीथला यांची बंड मागे घेण्यासाठी थेट दिल्लीतून सुत्र फिरल्याचे सांगितले जाते. के सी वेणूगोपाल हे मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक होते. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांना भेटीला बोलावून त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते राहिलेले व्ही के सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत देखील राहुल गांधी यांनी चर्चा केली होती. चेन्नीथला हे काहीसे नाराज होते. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांना आश्वासत करत त्यांच्या हिताचा विचार केला जाईल, असा शब्द दिला.

राहुल गांधी यांच्या फोननंतर चेन्नीथला यांचे सूर मावळले होते. त्यांनी सतीशन यांचा पाठींबा जाहीर करत तसे पत्र दिले होते. मात्र, ते स्वतः बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ते बंड करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहुल गांधींसोबतच्या फोन नंतर त्यांनी आपले बंड थंड केल्याची चर्चा आहे.

सतेत्त मिळणार वाटा?

रमेश चेन्नीथला यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसेल तरी त्यांना सत्तेत वाटा मिळणार असल्याची चर्चा आहे. ते मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील चेन्नीथला यांना मोठी जबाबदारी मिळेल, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT