Congress Politics : काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, मुख्यमंत्रि‍पदापासून डावलेला नेता राजीनामा देण्याच्या तयारीत!

Keral Congress Ramesh Chennithala : काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. केरळ मुख्यमंत्रि‍पदासाठी सतीशन यांचे नावाची घोषणा झाल्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्नीथला यांनी आमदाराचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : केरळममध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले माजी प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्निथला यांनी संयुक्त लोकशाही आघाडीच्या (यूडीएफ) बैठकीला अनुपस्थित राहून निषेध नोंदविला.

चेन्निथला यांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांची मनधरणी करीत आहेत. रविवारी (ता. १७) यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस दीपादास मुन्शी व अन्य वरिष्ठ नेते चेन्निथला यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गुरुवायूर मंदिरात दर्शन घेऊन परतल्यानंतर सतीशन यांनी चेन्निथला यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी चेन्निथला यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शविला.

व्ही. डी. सतीशन सरकारचा शपथविधी सोमवारी (ता.१८) पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील २० सदस्यांच्या खातेवाटपाबाबत उद्या (ता.१६) ‘यूडीएफ’च्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. काँग्रेसमध्ये सतीशन व चेन्न्निथला गटांमधील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असला तरी मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस व ‘आरएसपी’ या घटक पक्षांनी सतीशन यांना समर्थन दिले आहे.

Rahul Gandhi
New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास

सतीशन-विजयन भेट

केरळचे नियोजित मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी मावळते मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुख्यमंत्री म्हणून सतीशन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. सतीशन हे गुरुवारी दुपारी विजयन यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. विजयन यांनी सतीशन यांना घरात नेले.

विजयन यांचे कौतुक

चहापानावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आरोग्य आणि आहाराबाबत अनौपचारिक गप्पा झाल्या. सतीशन यांनी विजयन यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीत डावी लोकशाही आघाडीच्‍या (एलडीएफ) चा पराभव झाल्यानंतर विजयन यांनी शासकीय निवासस्थान सोडले आहे. सध्या ते बेकरी जंक्शन येथे एका घरात भाडेतत्वावर राहत आहेत.

Rahul Gandhi
Kerala CM : केरळचे नवे मुख्यमंत्री ठरले! 'या' नेत्याच्या नावाची घोषणा, राहुल गांधींचे धक्कातंत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com