New Delhi : विरोधी पक्षांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या जातनिहाय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. जातनिहाय जनगणना केवळ राजकीय फायद्यासाठी केली जाऊ नये, असे RSS कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘आरएसएस’चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी केरळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना हे विधान केले आहे. हिंदू धर्मात जात हा संवेदनशील मुद्दा आहे. हा मुद्दा राष्ट्रीय एकीकरणासाठी महत्वाचा आहे, असे सांगत आंबेकर यांनी जातनिहाय जनगणनेचा वापर निवडणुकीतील प्रचारासाठी आणि राजकारणाच्या उद्देशाने होऊ नये, असे सांगितले.
आंबेकर यांनी कल्याणकाही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जनगणना करण्यास पाठिंबा असल्याचे सांगितले. विशेषत: दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी सरकारला त्यांची गणना केली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जातनिहाय जनगणना हा खूप संवेदनशील विषय आहे. समाजाची एकता आणि अखंडतेशी संबंधित मुद्दा असल्याचे सूचक विधानही आंबेकर यांनी केले. पंच परिवर्तनमध्ये याविषयी चर्चा झाली. आम्ही मोठ्या प्रमाणात समरसतेविषयी काम करू, असेही आंबेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेत आणि संसदेबाहेरही सत्ताधारी एनडीए सरकारला सातत्याने घेरत आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याच मुद्दावर जोर दिला होता. भारत जोडो न्याय यात्रेसह लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी एससी, एसटी, ओबीसी समाजातील लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.
एनडीएमधील चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्या पक्षांनीही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे. आता आरएसएसकडूनही आपली भूमिका स्पष्ट करण्यात आल्याने एनडीए सरकार जनगणनेबाबत काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.