Delhi Waqf Scam : ‘वक्फ’च्या राजकीय गोंधळातच ED कडून आमदाराला अटक; कोणत्या घोटाळ्याचा केला पर्दाफाश?

Amanatullah Khan ED Waqf Scam : आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी मागील काही दिवसांपासून कथित घोटाळ्याबाबत चौकशी सुरू होती.
AAP MLA Amanatullah Khan
AAP MLA Amanatullah KhanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अमानतुल्लाह खान यांना सोमवार दुपारी ईडीकडून अटक करणअयात आली आहे. कथित दिल्ली वक्फ घोटाळ्याप्रकरण सकाळी ईडीने त्यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर काही तासांतच ईडी अधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घेतले.

ईडीचे सहा ते सात अधिकारी सकाळीच खान यांच्या घरी पोहचले होते. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. अटक केल्यानंतर खान यांनी मीडियाशी बोलताना आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ते दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आहेत.

AAP MLA Amanatullah Khan
Kolkata Rape-Murder Case : भाजप पहिल्यांदाच देणार ममतांना पाठिंबा; आज विशेष अधिवेशनात ऐतिहासिक विधेयक...

खान यांनी ईडीचे अधिकारी घरी पोहचल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आज सकाळी-सकाळी हुकूमशहाच्या इशाऱ्यावर कठपुतली ईडी माझ्या घरी आली आहे. मला आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यात हुकूमशाहाने कोणतीही कसर सोडलेली नाही. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे गुन्हा आहे का, असा सवाल खान यांनी केला होता.

काय आहे दिल्ली वक्फ घोटाळा?

आमदार खान हे कथित वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी चौकशी घेऱ्यात अडकले होते. ईडीकडून मनी लाँर्डिंगच्या प्रकरणात त्यांची चौकशी केली जात होती. त्यासाठीच सोमवारी सकाळीही ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. खान हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी बेकायदेशीरपणे 32 लोकांची भरती केली, तसेच निधी गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

AAP MLA Amanatullah Khan
Simi Rosebell John : काँग्रेसमध्ये घमासान; ‘कास्टिंग काऊच’चा आरोप करणाऱ्या महिला नेत्याची हकालपट्टी

खान यांनी वक्फ बोर्डाची संपत्ती चुकीच्या पध्दतीने भाडेत्वावर दिल्याचाही आरोप आहे. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच बेकायदेशीर भरतीबाबत विधान केले होते. त्यानंतर तपास यंत्रणा सक्रीय झाल्या होत्या. याप्रकरणी ईडीने खान यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.

वक्फ विधेयकावरून राजकारण

दरम्यान, वक्फ (सुधारित) विधेयकावरून संसदेच्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले होते. त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले. या समितीच्या सध्या बैठका सुरू असून पुढील अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाऊ शकते. हे राजकारण सुरू असताना वक्फ बोर्डातील घोटाळ्यावरून आपच्या आमदाराला अटक करण्यात आली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com