Jayalalithaa
Jayalalithaa sarkarnama
देश

जयललितांचा मृत्यू कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल समोर

सरकारनामा ब्यूरो

Jayalalithaa : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी अहवालातील माहिती समोर आली आहे. या चौकशी अहवालात तामिळनाडूतील एका उच्चपदस्थ शासकीय अधिकारी व जयललीता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करायला हवी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

माजी न्यायमूर्ती ए अरुमुघस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ मध्ये चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके पक्षाचे सरकार होते. जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भातील वाद तसेच दाव्यांची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली होती. आयोगाचा अहवाल आज (ता. १८) तामिळनाडूच्या विधानसभेत सादर करण्यात आला.

अहवालात तत्कालीन मुख्य सचिव डॉ. राम मोहन राव यांना गुन्हेगारी कृत्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. तत्कालीन आरोग्यमंत्री विजया बासकर यांच्याविरोधातही काही निरीक्षणे अहवालात नोंदवण्यात आली आहे. जयललिता यांच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयानेही खोटी विधाने केली होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जयललिता यांनी चार वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्या तामिळनाडू सह देशात त्या अत्यंत लोकप्रिय नेत्या होत्या. मूळच्या अभिनेत्री असलेल्या जयललिता यांना तामिळनाडूमध्ये प्रेमाने अम्मा म्हटले जात होते. मात्र, राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता या अहवालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT