भाजपची पत सावरणारी माघार; ठाकरेंची जिंकण्याची संधी हिरावली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विनंती पत्र कामाला आले आणि सामना झालाच नाही.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeraysarkarnama

Andheri East by-election : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाच्या उमेदवार ऋजुता रमेश लटके (Rituja Latke) आणि भाजपचे (BJP) मूरजी पटेल यांच्यात होणारी लढत अटीतटीची होती. दोन्ही पक्षांचे नेते कमालीच्या तयारीने सामन्यात उतरले होते. ऋतुजाताईंना सहानुभूतीचे वलय होते. तर मूरजी तीन पक्षात फिरुन आलेले अमराठी उमेदवार होते. मूरजी हरले असते तर भाजपची विचारसरणी मुंबईकरांना पसंत नाही, अशी टिका झाली असती.

मराठी उमेदवार सापडत नाही का? गुजराती पटेलांना पळता भुई थोडी झाली, असे आरोप झाले असते. भाजपला हे आरोप नको होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विनंती पत्र कामाला आले आणि सामना झालाच नाही. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना भाजपला पराभवाचा अपशकून नको होता. म्हणून त्यांनी माघार घेतली.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
अजितदादांच्या इच्छेला राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेनेच लावला सुरूंग

अर्थात शिवसेना (उध्दव बसळासाहेब ठाकरे) त्यामुळे एका रंगीत तालमीला मुकले. कॉंग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी लटके यांना पाठिंबा दिला होता. घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही मते शिवसेनेला खरेच मिळाली असती का? मुस्लिम समुदाय आता शिवसेनेकडे झुकू लागला आहे. तो खरोखरच मतदानही सेनेला करेल का हा प्रश्न कितीही नाही म्हंटले तरी उध्दव ठाकरे यांच्या सहकार्यांच्या मनात होताच. त्या प्रश्नालाही उत्तर मिळाले नाही. शिवाय या निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या असत्या तर मुंबई आमची आहे असा प्रचार महापालिका निवडणुका होईपर्यंत उध्दव ठाकरे यांना करता आला असता.

त्या शक्यतेवर भाजपने पाणी फेरले आहे. परंपरांचा आदर करण्याची भाजपला काही असोशी नव्हती. तसे असते तर पंढरपूर येथे निवडणुकात भाजपने भागच घेतला नसता. भाजपेतर पक्षांनीही भलते दावे करु नयेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अशोकराव पाटील यांनी प्रीतम मुंडे यांना आव्हान दिले होते. राजकारणात जे करायचे नसते ते करुन दाखवले होते, अशी भाषा वापरली जाते.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
आमदार जगतापांचं आरोग्यमंत्र्यांना साकडं; म्हणाले,गरीब बाळांसाठी एवढं कराच..

जनता सत्य जाणते. त्यामुळे भाजपने परंपरा वाचवायला नव्हे तर पत सावरायला माघार घेतली आहे. अर्थात या साठी राज ठाकरे यांचे पत्र कामाला आले. त्यांच्या शब्दानुसार भाजप वागली. यामुळे राज ठाकरे यांची प्रतिमा मराठी माणसाच्या मनात उंचाबली गेली तर मनसेला मते मिळतील. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन हजार मते मनसेने मिळवली तरी मतविभाजनाचा लाभ भाजपला होईल.

संभाव्य पराभवातून वाट काढणाऱ्या भाजपने उध्दव ठाकरे यांच्या एका आमदाराला निवडून तर पाठवले पण त्यांना आम्ही जिंकू शकतो हे दाखवण्याची संधी दिली नाही. आशीष शेलार विजयाबद्दल संपूर्णत: आश्वस्त असतानाही त्यांच्या उत्साहावर पाणी टाकून भाजपने पुढची वाट सोपी करुन ठेवली आहे.

भाजप समवेत निवडणूक जिंकली तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे भाजपनेते कमालीचे दुखावले गेले, संतापलेही. अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनासंबंधी भाजपने कानावर हात ठेवले. त्यानंतर सुरु झालेली प्रतिशोधाची लढाई. शिवसेनेची दोन शकले तर झाली. सरकारही बदलले. मात्र, शिवसेनेचा प्राण मुंबई महापालिकेतल्या सत्तेत आहे, ती सत्ता उध्दवजींच्या हातून जावी यासाठी भाजप प्रयत्न करेल हे सरळ.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
मोठी बातमी : खासदार निंबाळकरांचा रेल्वे समितीचा राजीनामा; पुण्यातील बैठकीतून ९ खासदारांचा ‘वॉक आऊट’

निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याला पाडण्याचे प्रयत्न करण्यात गैर काही नाही. मुंबईत मराठी माणसाएवढाच टक्का आता अमराठींचा आहे, असे म्हणतात. मोदीत्व, भाजपची यंत्रणा, फडणवीसांची प्रतिमा, शेलार आणि चमूचे काम या जोरावर भाजप महापालिकेवर भगवा फडकावेलही. खासदार कोटक, माजी खासदार किरीट सोमैया, अतुल भातखळकर, योगेश सागर असे भाजपनेते ठाकरे गटाला परास्त करण्यासाठी संपूर्ण ताकदिनिशी प्रयत्नरत आहेत.

दुसरीकडे दसरा मेळाव्यास सेनेचे कार्यकर्ते एकदिलाने हजर राहिल्याने उध्दव ठाकरे आणि आदित्य यांना बळ मिळाले आहे. संघर्ष तीव्र होता. पोटनिवडणुकीत सहानुभूती कामाला येते, मोदीत्व नव्ह. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण करायला नको होते. उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचा थंड डोक्याचा गट देर आए, दुरुस्त आए म्हणतोय. तयारीने आक्रमण करण्यासाठी माघार घेणे कधी कधी उचित ठरते. भाजपने ते केले अन् सेनेच्या विजयाची संधी हिरावून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com